मुंबई : अनेक भारतीयांना विमानाचा प्रवास वेगवान असला तरीही रेल्वेने प्रवास करण्यातच खरा आनंद मिळतो. प्रवाशांची  गरज ओळखून रेल्वेदेखील त्यामध्ये अनेक बदल करत आहे. तिकिट बुकिंगपासून थेट रेल्वेच्या लूकमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.  


रेल्वे तिकीट बुकिंग होणार सुकर   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वेचं तिकीट बुक करणंदेखील आता अधिक सुकर होणार आहे. यापूर्वी ट्रेन बुकिंग चार महिने आधी करण्याची सोय दिली. त्यापाठोपाठ ऑनलाईन बुकिंगच्या वेळांना वर्गवारीनुसार ठराविक वेळा देण्यात आल्या. पण आता तात्काळ बुकिंगच्या सोबतच ट्रेन सुटण्याच्या तीस मिनिटे आधीसुद्धा तिकीट बुक करण्याची सोय खुली करण्यात आलि आहे.  


नवी सोय  


रेल्वेचे प्रस्थान होण्यापूर्वी चार्ट बनवला जातो. या चार्ट बनवण्याच्या प्रक्रियेमध्येही बदल करण्यात आले आहेत. आता रेल्वे दोनदा चार्ट बनवणार आहे. त्यामुळे ट्रेन सुटण्याच्या ३० मिनिटं पूर्वीदेखील तिकीट बुक करणं शक्य होणार आहे. 


पहिला चार्ट ट्रेन सुटण्याआधी चार तास आधी बनवला जाईल. तर दुसरा चार्ट अर्धा तास आधी बनवला जातो. ही बुकिंग इंटरनेटप्रमाणेच रिझर्व्हेशन खिडकीवरही करता येईल.