UPI Bill Payment: तंत्रज्ञानाचं युग असून पैशांची देवाणघेवाण ऑनलाईन पद्धतीने होत आहे. यामुळे सुट्ट्या पैशांसाठीचा त्रास कमी झाला आहे. त्यामुळे अनेकजण आपल्या खिशात रोख रक्कम ठेवत नाहीत. तसेच ऑनलाईन पेमेंटवर अवलंबून असतात. पण कधी कधी इंटरनेट सुविधा व्यवस्थित नसल्याने ऑनलाईन पेमेंट करण्यात अडचण येते. त्यामुळे कधी कधी नाचक्की होते. तुम्हाला माहिती आहे का? इंटरनेट सुविधेशिवाय तुम्ही UPI ही सेवा वापरू शकता. UPI पेमेंट करण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशननं (NPCI) 123PAY लाँच केले आहे. या सेवेद्वारे फीचर फोनवरूनही UPI पेमेंट करता येते. ही सुविधा वापरण्याासठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि बँक खाते लिंक करावे लागेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, या सुविधेद्वारे विविध प्रकारचं पेमेंट करू शकता. जसे की फास्टॅग रिचार्ज करणे, युजर्स आयव्हीआर  (Interactive Voice Response) नंबरवर कॉल करू शकतात आणि फीचर फोनमध्ये मिस्ड कॉल आणि साउंड-आधारित पेमेंट देखील करू शकतात. पैसे ट्रान्सफर करण्यासाठी 123PAY च्या सुविधेचा लाभ घेऊ शकता. यासोबतच तुम्ही तुमच्या मोबाईलचे बिलही भरू शकता.


123PAY वापरून वीज बिल कसे भरावे


वीज बिल भरण्याासाठी ही सुविधा तुम्ही वापरू शकता. 123PAY फीचर वापरण्यासाठी वापरकर्त्यांना UPI पिन तयार करावा लागेल. हा UPI पिन तुमच्या बँक खात्यातून जनरेट केला जाईल. फीचर फोन वापरणाऱ्यांना बँकेत यूपीआय पिन काढावा लागेल. या यूपीआय पिनद्वारे तुम्ही तुमचे पेमेंट करू शकता. वीज बिल भरण्यासाठी, तुम्हाला 080-4516-3666 किंवा 6366 200 200 नंबरवर कॉल करावा लागेल. यानंतर, तुम्हाला वीज बिल भरण्याचा पर्याय निवडावा लागेल. पेमेंट पर्याय निवडल्यानंतर, तुम्हाला तुमचा वीज मंडळ निवडावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या बिलावर दिलेला ग्राहक क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर बिलाची माहिती मिळेल आणि शेवटी पेमेंट करण्यासाठी तुम्हाला तुमचा यूपीआय पिन टाकावा लागेल. त्यानंतर बिलाची रक्कम भरली जाईल.


Good News: सरकारी बँकेकडून दोन नव्या डिपॉझिट स्किम लाँच, व्याजदर जास्त असल्याने होणार फायदा


आरबीआयची हेल्पलाइन


इंटरनेटशिवाय डिजिटल पेमेंटसाठी आरबीआयने हेल्पलाइन सुरू केली आहे. ही हेल्पलाइन नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) तयार केली आहे.  digisathi.com च्या माध्यमातून फिचर फोन यूजर्स कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवल्यास मदत घेऊ शकतात. तसेच, तुम्ही तुमच्या समस्यांसाठी 14431 आणि 1800 891 3333 या फोन नंबरवर कॉल करू शकता.