Indian Railways : विना तिकीट रेल्वेने प्रवास करणं शक्य, कसं ते जाणून घ्या
तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल आणि तुमच्याकडे ट्रेनचं तिकीट नसेल, तरीही तुम्हाला आता घाबरण्याची गरज नाही.
मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल आणि तुमच्याकडे तिकीट नसेल, तरीही तुम्हाला आता TTEला घाबरण्याची गरज नाही. कारण यासाठी रेल्वेने एक खास नियम बनवला आहे, ज्यानुसार तुम्ही प्रवास करू शकता. ज्यामध्ये असे सांगितले आहे की, जर तुमच्याकडे आरक्षण नसेल, तर आता तुम्ही फक्त प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन ट्रेनमध्ये चढू शकता आणि त्यानंतर तुम्हाला TTE शी संपर्क साधावा लागेल.
तुम्हाला तिकीट तपासनीसकडे जावे लागेल आणि तेथे जाऊन तुम्ही तुमचे तिकीट काढू शकता. तुम्हाला तुमची सर्व माहिती तिकीट तपासकाला सांगावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या गंतव्यस्थानापर्यंत तिकीट काढावे लागेल.
ट्रेनमध्ये सीट कमी असल्यामुळे तुम्हाला आरक्षित सीट मिळण्यात अडचण येऊ शकते, परंतु तिकीट तपासक तुम्हाला प्रवास करण्यापासून रोखू शकत नाही. तुमच्याकडे आरक्षण तिकीट नसेल तर तुम्हाला 250 रुपये दंड आकारावा लागेल.
प्रवाशांना तिकीटाच्या एकूण भाड्यासह 250 रुपये दंड आकारून तिकीट काढावे लागेल. प्लॅटफॉर्म तिकीट धारण केल्यानंतर, प्रवासी ट्रेनमध्ये चढण्यास पात्र ठरतो. प्लॅटफॉर्म तिकीट ज्या स्थानकावरून घेतले आहे त्याच स्थानकावरून प्रवाशाला भाडे द्यावे लागेल हे माहित असू द्या
याशिवाय जर तुमची ट्रेन कोणत्याही कारणास्तव चुकली तर तिकीट तपासनीस पुढील 2 स्टेशनपर्यंत तुमची सीट कोणालाही देऊ शकत नाही.