फक्त ५ हजारात फिरा या ४ Untouch जागा
हल्ली धकाधकीच्या जीवनात प्रत्येकक्षण काही दिवस शांततेचे आणि निसर्गाच्या सानिध्यातले शोधत असतो. आणि अशावेळी जर लाँग विकेंड मिळाला तर मग काय मज्जाच असते. यंदा ऑगस्ट महिन्यात असे लाँग विकेंड एक दोन नाही तर तब्बल ३ वेळा असे लाँग विकेंड आहेत. ५ ते ७ ऑगस्ट, १२ ते १५ ऑगस्ट आणि २५ ते २७ ऑगस्ट या दिवसांमध्ये प्रत्येकाला लाँग विकेंड मिळणार आहे. एकाचवेळी तीन लाँग विकेंड आणि सणांची सरबत्ती असल्यामुळे थोडा खिशाला देखील कात्री बसणार आहे. असं असताना मनमुराद फिरण्यावर हा उत्तम पर्याय आहे. आता तुम्ही फक्त ५ हजारात देशातील या Untouch जागा फिरू शकता....
मुंबई : हल्ली धकाधकीच्या जीवनात प्रत्येकक्षण काही दिवस शांततेचे आणि निसर्गाच्या सानिध्यातले शोधत असतो. आणि अशावेळी जर लाँग विकेंड मिळाला तर मग काय मज्जाच असते. यंदा ऑगस्ट महिन्यात असे लाँग विकेंड एक दोन नाही तर तब्बल ३ वेळा असे लाँग विकेंड आहेत. ५ ते ७ ऑगस्ट, १२ ते १५ ऑगस्ट आणि २५ ते २७ ऑगस्ट या दिवसांमध्ये प्रत्येकाला लाँग विकेंड मिळणार आहे. एकाचवेळी तीन लाँग विकेंड आणि सणांची सरबत्ती असल्यामुळे थोडा खिशाला देखील कात्री बसणार आहे. असं असताना मनमुराद फिरण्यावर हा उत्तम पर्याय आहे. आता तुम्ही फक्त ५ हजारात देशातील या Untouch जागा फिरू शकता....
१) 'ओरछा'चा शाही अंदाज : मध्य प्रदेशच्या बेतवा नदी किनारी स्थित असलेलं ओरछा हे शहर. पावसात या शहराची सुंदरता अधिकच खुलते. नॅच्युरल ब्युटीसोबतच इथे डेस्टिनेशन मंदिर आणि महालांसाठी लोकप्रिय आहे. महत्वाचं म्हणजे इथे फक्त २ रात्र आणि ३ दिवसाचा खर्च हा फक्त ४ हजार ५०० रुपये इतका आहे. जर तुम्ही ट्रॅव्हल पॅकेजमध्ये जाता तर याचा खर्च कमी होऊन फक्त ३ हजार रुपये इतके होतील. इथे बघण्यासारख्या जागा म्हणजे राम राजा मंदिर, ओरछा किल्ला, जहांगीर महाल, चतुर्भुज मंदिर आणि राजा महाल.
२) निसर्गाच्या सुंदरतेने नटलेलं 'डलहौजी' - जर तुम्हाला इंच डोंगर आणि निसर्गाच्या सुंदरतेबाबत आकर्षण असेल तर तुम्ही हिमाचल प्रदेशच्या प्रेमातच पडाल. डलहौजी तुमचं मन जिंकल्याशिवाय राहणार नाही. इथली हिरवळ पावसात बघण्यासारखी असते. ज्यामुळे ऑगस्ट महिना इथे जाण्यासाठी अतिशय उत्तम आहे. इथे थांबण्यासाठी प्रत्येकी २ रात्र ३ दिवसाचे पॅकेज फक्त ५ हजार रुपयात मिळेत. इथे जवळपास अनेक ठिकाण आहेत जिथे तुम्ही फिरू शकता.
३) 'माऊंट आबू' वाळवंटातील हिल स्टेशन : राजस्थानचा सर्वात सुंदर हिल स्टेशन म्हणजे माऊंट आबू. येथील दिलवाडा मंदिर भरपूर प्रसिद्ध आहे. इथे येण्यासाठी तुमच्या खिशावर जास्त जोर पडणार नाही. २ रात्र ३ दिवसांसाठी इथे फक्त ५ हजार रुपये लागतात.
४) 'व्हॅली ऑफ फ्लावर' : उत्तराखंडमधील व्हॅली ऑफ फ्लावर ही जागा फिरण्यासाठी अगदी उत्तम आहे. तुम्ही जर फूल लव्हर असाल तर तुम्हाला इथे प्रचंड रंगाची फूल पाहायला मिळतील. वाइल्ड रोज, डालिया, सेक्सिफेज, गोंड्यासारखे असंख्य फूल येथे आहेत. इथे राहण्यासाठी प्रत्येकी २ रात्र ३ दिवसांसाठी फक्त ३५०० रुपये लागतील.