नवी दिल्ली : पुढील वर्षी पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या हंगामात सर्वच राजकीय पक्ष आपापल्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. सर्वच पक्ष मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणत्याही पक्षाला जिंकण्यासाठी मतदान आवश्यक आहे. मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी ओळखपत्र म्हणून, निवडणूक आयोग सर्व मतदारांना मतदार ओळखपत्र जारी करतात. तुमचे मतदार ओळखपत्र हरवले असेल तर, काळजी करण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला मतदार कार्डाशिवाय मतदान कसे करायचे ते सांगणार आहोत.


मतदार यादीत नाव असणे आवश्यक 
यासाठी तुमचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे. जर तुमचे नाव मतदार यादीत असेल आणि तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसेल, तर निवडणूक आयोगाने इतर 11 प्रकारच्या कागदपत्रांना ओळखपत्र म्हणून मान्यता दिली आहे. जे दाखवून तुम्ही मतदान करू शकता.


जर एखाद्याचे नाव मतदार यादीत नसेल आणि त्याने मतदान करण्यासाठी आपले आधार कार्ड किंवा मतदार कार्ड किंवा इतर कोणतेही ओळखपत्र मतदान केंद्रावर दाखवले तर त्याला मतदान करण्याची परवानगी नसते. मतदार यादीत नाव नोंदवल्यानंतरच मतदानाचा हक्क बजावता येतो.


हेही वाचा - आता नोकरी सोडणंही महागणार; नोटीस पीरियडमध्ये भरवा लागणार कर


या कागदपत्रांच्या आधारे मतदान 
तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसल्यास, इतर कागदपत्रांच्या आधारेही मतदान करता येते. मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त, निवडणूक आयोगाने या इतर 11 प्रकारच्या कागदपत्रांनाही मान्यता दिली आहे.


1. पासपोर्ट.
2. ड्रायव्हिंग लायसन्स.
3. तुम्ही केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी असाल किंवा PSUs आणि Public Limited कंपनीमध्ये काम करत असाल, तर कंपनीच्या फोटो आयडीच्या आधारेही मतदान करता येईल.
4. पॅन कार्ड.
5. आधार कार्ड.
6. पोस्ट ऑफिस आणि बँकेने जारी केलेले पासबुक.
7. मनरेगा जॉब कार्ड.
8. कामगार मंत्रालयाने जारी केलेले आरोग्य विमा कार्ड.
9. पेन्शन कार्ड ज्यावर तुमचा फोटो चिकटवला आहे आणि साक्षांकित आहे.
10. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (NPR) द्वारे जारी केलेले स्मार्ट कार्ड.
11. खासदार/आमदार/एमएलसी यांनी जारी केलेले अधिकृत ओळखपत्र.


मतदार यादीत आपले नाव कसे तपासायचे
प्रत्येक निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोग मतदार यादी अद्ययावत करतो. या दरम्यान नवीन मते जोडली जातात आणि काही वेळा मतदार यादीतून मतदाराचे नाव कमी होते. अशा स्थितीत निवडणुकीपूर्वी मतदार यादीत आपले नाव नक्की तपासा. जर तुमचे नाव मतदार यादीत नसेल तर निवडणूक आयोगाकडे तक्रार करून तुम्ही तुमचे नाव पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करू शकता. मतदार यादीतील नाव तपासण्यासाठी तुम्हाला या चरणांचे अनुसरण करावे लागेल.


हे देखील वाचा - IAS Success Story | फक्त 1 वर्ष अभ्यास करून 22 व्या वर्षी बनली IAS; कसे ते वाचा


निवडणूक आयोगाच्या वेबसाइट electoralsearch.in वर लॉग इन करा. येथे मतदार दोन प्रकारे शोधू शकतात. पहिल्या पर्यायामध्ये नाव, जन्मतारीख आणि इतर काही माहिती टाकून तुम्ही तुमचे नाव तपासू शकता. 


दुसऱ्या पर्यायामध्ये कार्डवर दिलेल्या EPIC क्रमांकाद्वारे मतदारांना माहिती मिळू शकते.


EPIC क्रमांकाला मतदार ओळखपत्र क्रमांक म्हणतात. या क्रमांकाद्वारे तुम्ही मतदार यादीतील तुमचे नाव तपासू शकता.


माहिती दिल्यानंतर तुमच्यासमोर मतदार यादी उघडेल आणि तुमचा तपशील तेथे उपस्थित असेल.


सर्व माहिती देऊनही माहिती समोर आली नाही, तर निवडणूक आयोगाच्या 1800111950  या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल.