Condom sales Increase in Navratri :


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वत्र नवरात्रीची धूम सुरु आहे. तरुण तरुणी सजून नटून नवरात्रीचे नऊ दिवस रोज गरबा, दांडिया खेळण्यासाठी जातात. गेल्या काही वर्षांपासून नवरात्रीचा गरब्या खेळाचं मोठं ग्लोबल आणि इव्हेंट झाला आहे. मोठ्या मोठ्या मैदानावर तरुण तरुणी उत्साहात स्वच्छंदी मोहात रंगून जातात. गेल्या काही वर्षांपासून गरबा आणि त्या दरम्यान कंडोमची होणारी विक्री हा नवीन वाद निर्माण झाला आहे. खरं तर एका सर्वेक्षणातून धक्क्दायक आकडेवारी समोर आली आहे. एवढंच नाही तर या दिवसांमध्ये गर्भनिरोधक गोळी विक्रीची वाढ होते. (You know the reasons behind the highest sales of condoms during Navratri )


या गरबा सोहळ्यासाठी डान्स कोरिओग्राफर, सेलिब्रिटींची मागणी जोरदार असते. फाल्गुनी पाठकचा दांडिया नाइट हे खूप प्रसिद्ध आहे. गुजरातमध्ये नऊ दिवसांमध्ये नवरात्रीचा उत्साह मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. गुजरातमधील शहरांमध्ये दांडिया नाइटसाठी अख्ख कुटुंब घराबाहेर असतं असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. प्रमुख शहरांत करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या आणि प्रायव्हेट डिटेक्टिव्ह यांची मागणी वाढते. आता तुम्ही म्हणाल प्रायव्हेट डिटेक्टिव्ह कशासाठी तर मुलांविषयीची चिंतेपोटी पालक मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी डिटेक्टिव्हची नेमणूक करतात. 


कंडोम विक्री वाढण्यामागील कारणं?


तज्ज्ञांच असं मत आहे की, यात सिनेमाचा वाटा मोठा मानला जातो आहे. नवरात्रीत देवाचा जागर म्हणजे गरबा हा खेळ आराधनेचा एक भाग आहे. मात्र चित्रपटामुळे गरब्या आणि दांडियाला मोठं ग्लॅमर निर्माण झालं. हे नऊ दिवस बेभान आणि मनोसक्त खास करुन नटूनथटून गरबा खेळण्याची क्रेझ वाढत गेली. अशावेळी एकमेकांविषयी आकर्षण निर्माण होतं ही एक निसर्गिक प्रक्रिया आहे, असं तज्ज्ञांचं मतं आहे. त्याशिवाय दोन प्रमुख कारणं देखील आहे. 


पहिलं कारण 


ऑक्टोबर महिन्यातील हवामानाबद्दल बोलायचं झालं तर या महिन्यात दिवसा उष्णता आणि रात्रीची हलकीशी थंडी... रात्री असणारं अल्हाददायक वातावरण त्यामुळे आपल्या शरीरात हार्मोनल बदल होतात. त्यामुळे जोडपी आपसूकच जवळीक साधतात आणि त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध होतात, ही एक साहजिक क्रिया आहे, असं असे तज्ज्ञांचं मत आहे. 


दुसर कारण


इतर वेळी मुलांना रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहता येतं नाही. पण गरबा आणि दांडिया नाइटनिमित्त त्यांना पालकांकडून रात्री घराबाहेर राहण्याची सहज परवानगी मिळते. त्यामुळे अशावेळी बंधनमुक्त मुलं भावनेच्या भरात आणि मिळालेल्या संधीचा पूरेपुर फायदा घेतात. 


कंडोम विक्रीतेचं मत


इतर वेळी मुलांना खरं तर नवरात्री काळात कंडोमची विक्री वाढली ही, एक मेथड आहे, जी प्रसिद्धसाठी वापरण्यात येते. खरं तर नवरात्रीपासून सणांना सुरुवात होते म्हणून कंडोमच्या विक्रीत वाढ होते, असं कंडोम विक्रीत्यांचं म्हणं आहे. तर दुसरीकडे नवरात्रीच्या दिवसांमध्ये 20 ते 50 टक्के वाढ होते, असा अहवाल आहे.