GST on Cancellation of Booking: आजकाल सगळीकडे महागाईचे वातावरण आहे. दीड महिन्यांपुर्वी GST वाढविल्याने महागाईच्या झळा नागरिकांवर पडू लागल्या होत्या, त्यात आता भर म्हणून RBI ने आता Repo rate ही वाढवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशी परिस्थिती असताना आता आपल्याला आणखी एक काळजी घेणे आवश्यक ठरणार आहे. आपण सर्वच जण सिनेमा पाहण्यासाठी, हॉटेलमध्ये जाण्यासाठी टिकिटाचे किंवा हॉटेलचे Advance बुकींग करतो. पण हे बुकिंग करतानाही तूम्हाला विशेष काळजी आता घ्यावी लागणार आहे. कारण समजा तूम्ही हॉटेलचे बुकींग केले आणि सिनेमा पाहण्यासाठी किंवा नाटक पाहण्यासाठी तिकीटाचे बुकींग केले आणि ते तूम्ही आयत्यावेळी रद्द केलेत तर तुम्हाला अतिरिक्त पैसे द्यावे लागणार आहे ज्याचा तूमच्या खिशाला भुरदंड पडू शकतो. 


नुकतेच अर्थ मंत्रालयाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे की रद्दीकरण शुल्कावर (Cancellation charges) अतिरिक्त पैसे GST च्या स्वरूपात भरावे लागतील. अर्थ मंत्रालयाच्या tax research unit ने याबाबत स्पष्टीकरण देणारी 3 पत्रके प्रसिद्ध केली आहेत. 


पत्रकात काय म्हटले आहे? 
जेव्हा तुम्ही कोणतेही बुकिंग करता तेव्हा एकप्रकारे तुम्ही करार करता आणि जेव्हा तूम्ही ते रद्द करता तेव्हा तो करार रद्द केल्यासारखे होते कारण त्याबदल्यात तुम्हाला सेवा मिळत असते. 


या 3 पत्रकांपैकी एका परिपत्रकात याच करार भंगाचा (breach of contract) उल्लेख करण्यात आला आहे. जेव्हा ग्राहक हा करार रद्द करतो तेव्हा सेवा प्रदात्याला रद्दीकरण शुल्क (Cancellation charges) म्हणून उत्पन्न (income) मिळते. कारण रद्दीकरण शुल्क (Cancellation charges) ही सेवा आहे आणि सेवा रद्द करण्याची विशिष्ट किंमत असते. अशा परिस्थितीत या त्या उत्पन्नावर GST आकारला जातो. 


तिकीट रद्द केल्यावर रद्दीकरण शुल्कावर (Cancellation charges) GST आकारला जाईल. जर तुम्ही रेल्वेचे तिकीट खरेदी केले असेल आणि त्यावर रद्दीकरण शुल्क (Cancellation charges) 200 रुपये असेल तर 200 रुपयांवर जीएसटी लागू होईल. हा नियम सर्व प्रकारच्या बुकिंगसाठी लागू असेल.