नवी दिल्ली : देशातील सर्व नागरिकांसाठी लसीकरणाच्या मोहीमेला वेग आला आहे. कोविन CoWIN कोविन पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी अनेक लोकांना अडचणी येत आहेत.  अशातच काही लोकांना लसीची तारिख मिळतेय परंतु ते त्या तारखेला जाऊ शकत नाहीये. परंतु तरीही त्यांना लस घेतल्याचा मॅसेज येत आहे. संशोधनानंतर डेटा एंन्ट्रीमधील वॅक्सिनेटरकडून ही चूक झाल्याचं दिसून आलं आहे.


CoWIN सिस्टिमकडून नवीन फीचरची घोषणा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोविन नोंदणी केल्यानंतर किंवा करताना येणाऱ्या अडचणींचा विचार करता. सिस्टिमने नवीन फीचर जारी केले आहे. यानुसार चार अंकी सुरक्षा कोड 8 मे पासून सुरू होणार आहे. यानुसार तुम्ही ठरलेल्या दिवशी लस घ्यायला गेलात की, तो 4 अंकी सुरक्षा कोड तुम्हाला विचारेल. त्यानंतर तो पोर्टलमध्ये अपडेट केला जाईल. कोड अपडेट केल्यानंतर तुम्ही लस घेतल्याची पुष्टी केली जाईल.


या कागदपत्रांची गरज


लसीकरणादरम्यान, अपॉइंटमेंट स्लिप दाखवणे गरजेचे असेल. त्यावर 4 अंकी सुरक्षा कोड देखील असेन. लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर SMS येईल की, तुम्ही यशस्वीरित्या लस घेतली आहे.