रांची : आपल्याकडे मुंबईत किंवा मेट्रे सिटीमध्ये लिव्हइनरिलेशशिप ही कॉन्सेप्ट अगदी सामान्य आहे. येथे बरेच जोडपे लिव्हइनमध्ये म्हणजेच लग्न न करता एकत्र राहातात. तसे पाहाता मेट्रो सिटीमध्ये हे अगदी सामान्य असेल तरी देखील बरेच लोक याला मानत नाही, कारण ही आपल्या भारताची संस्कृती नाही. आपल्याकडे असं होत नाही. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, झारखंड सारख्या भागात अनेक जोडपी लिव्हइनमध्ये राहात आहे. तसेच यामागचं कारण तुम्हाला विचार करायला लावेल. येथील जोडप्यांकडे लग्न करण्यासाठी पैसे नसल्याने हे लोक विना लग्नाचे एकत्र राहात आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही गोष्ट उघड झाली, जेव्हा झारखंडमधील खुंटी येथे रविवारी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या सुमारे 1350 जोडप्यांनी एकत्र लग्न केले. खंटी स्टेडियमवर जिल्हा प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था निमित यांच्या संयुक्त विद्यमाने या सामूहिक विवाह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


या सामुहिक विवाह सोहळ्याबाबत सांगताना ग्रामविकास विभागाचे सचिव एन.एन.सिन्हा म्हणतात की, या लोकांना आर्थिक परिस्थिती आणि इतर अनेक कारणांमुळे लग्न करता येत नाही. त्याचबरोबर अनेक जोडप्यांना कार्यक्रमाचा खर्चही उचलणे शक्य होत नाही. ज्यामुळे त्यांना असे रहावं लागत आहे.


पुढे न.एन.सिन्हा म्हणाले की, 'लिव्हइनरिलेशनशिपला समाजात मान्यता मिळत नाही, त्यामुळे या जोडप्यांना आयुष्यभर समस्यांना सामोरे जावे लागते, ज्यामुळे गावातील महिला आणि त्यांच्या मुलांचे सर्वाधिक नुकसान होत आहे. तसेच सर्व शासकीय योजनांपासून देखील ते वंचित राहातात. ज्यामुळे आम्ही हे करण्याचा निर्णय घेतला.



या वेळी उपायुक्त शशी रंजन म्हणाले की, या नवविवाहित जोडप्यांना सर्व कल्याणकारी योजनांशी जोडण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यासोबतच त्यांच्या विवाह नोंदणीचीही खात्री केली जाणार आहे. येत्या काही दिवसांत नोंदणीकृत विवाह प्रमाणपत्रही जोडप्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.


या जोडप्यांना समाजात मान आणि त्यांचे अधिकार मिळावेत, या भवनेनं त्यांचं लग्न करुन दिलं गेलं आहे. या जोडप्यांना या लग्नात भांडी आणि इतर भेट वस्तु देखील देण्यात आल्या आहेत.