लखनऊ : प्रेमप्रकरणात आत्महत्येचा एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. उत्तर प्रदेशमधील हमीरपूरमध्ये एका युवकाने फाशी घेत आत्महत्या केली. पण याआधी त्याने फाशीचा फंदा गळात घालून सेल्फी काढत तो फोटो घरच्या व्यक्तींना आणि मित्रांना पाठवला. फाशी घेतानाचा फोटो पाहून घऱच्या व्यक्तींना धक्काच बसला. काही तास शोध घेतलयानंतर या युवकाचा शोध लागला. एका झाडाला लटकलेल्या स्थितीत त्याचा मृतदेह आढळला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युवकाने आपल्या प्रेयसीच्या विवाहाची बातमी ऐकताच हे पाऊल उचललं. प्रेयसीच्या विवाहाच्या बातमीने दु:खी झालेल्या या युवकाने एका शेतात बाभळीच्या झाडाला फास बांधून फाशी घेतली.


वय वर्ष 19 असलेल्या लक्ष्मी प्रसाद प्रजापती हा राजस्थानच्या अलवरमध्ये एका कारखान्यात नोकरी करायचा. महोबामध्ये राहत असलेल्या या युवतीच्या तो प्रेमात पडला. त्याला तिच्यासोबत विवाह करायचा होता. पण दोघांच्या कुटुंबियांना ते मान्य नव्हतं.


शुक्रवारी लक्ष्मी प्रसाद राजस्थानवरुन येत असताना त्याला प्रेयसीच्या लग्नाची बातमी कळाली. बसमधून तो मध्येच उतरला आणि एका शेतात जावून त्याने आत्महत्या केली.


पोलीस अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी माहिती दिली की, मृत युवकाचे वडील फोनवर आलेल्या मॅसेजमुळे घाबरले होते. ते सगळीकडे त्याचा शोध घेत होते. पोलीस शोध घेत घेत या ठिकाणी पोहोचले.