नवी दिल्ली : आधार कार्ड हे एक महत्वाचे डॉक्युमेंट आहे. यामध्ये तुमची संवेदनशील माहिती असते. तुमच्या आधार कार्डचा (Aadhaar Card News) चुकीचा वापर होत असल्याची तुम्हाला शंका असल्यास ऑथेन्टिकेशन हिस्ट्री चेक करून माहिती घेता येते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधार ऑथेन्टिकेशन हिस्ट्रीमध्ये कोणती माहिती मिळेल?
आधार ऑथेन्टिकेशन सर्विसमध्ये तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर असणे गरजेचे आहे. याआधारे आधार अपडेशन, ऑथेन्टिकेशनची तारिख आणि वेळ, युआयडीएआयचा रिस्पॉन्स कोड, कोडसोबतच ट्रांजॅक्शन आयडी, ऑथेन्टिकेशन रिस्पॉन्स इत्यादीबाबत माहिती मिळते. या सुविधेअंतर्गत 6 महिन्यांतील कमाल 50 रेकॉर्ड्सबाबत माहिती मिळू शकते. एकावेळी 50 रेकॉर्ड्स तुम्ही पाहू शकता.


रेकॉर्डमध्ये दिसणारे ट्रांजॅक्शन तुम्ही पूर्ण केले नसेल तर काय करता येईल ?
फेल झालेल्या ऑथेन्टिकेशन ट्रांजॅक्शन रेकॉर्डचा एक विशिष्ट एरर कोड असतो. जर असे कोणतेही ट्रांजॅक्शन रेकॉर्डमध्ये दिसत असेल जे, तुम्ही पूर्ण केलेले नाही. त्यासाठी ऑथेन्टिकेशन युजर एजंन्सीशी संपर्क करू शकता. 


आधार ऑथेन्टिकेशन हिस्ट्री जाणून घेण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा.


स्टेप 1 ः सर्वात आधी UIDAIच्या अधिकृत संकेतस्थळावर uidai.gov.in वर जा


स्टेप 2 : या वेबसाईटवर होमपेजवर दिलेल्या ‘Aadhaar Services option under the My Aadhaar tab’वर क्लिक करा.


स्टेप 3 ः येथे तुम्हाला आधार ऑथेन्टिकेशन हिस्ट्रीचा पर्याय निवडावा लागेल.


स्टेप 4ः यानंतर 12 अंकांचा आधार नंबर 16 अंकांचा वर्च्युअल आयडी नंबर आणि कॅप्चा कोड टाकून SENT OTP वर क्लिक करा


स्टेप 5 ः रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर पाठवलेल्या ओटीपीला टाकून सबमिट करा.


स्टेप 6 ः या स्टेपमध्ये तुम्हाला आधार ऑथेन्टिकेशन टाइपच्या बाबतीत सिलेक्ट करावे लागेल


स्टेप 7 ः यानंतर तुम्हाला गरजेचेच्या रेकॉर्डच्या माहितीसाठी तारीख निवडावी लागेल. 


स्टेप 8 ः यानंतर तुम्हाला आधार ऑथेन्टिकेशनचा रेकॉर्ड स्क्रीनवर दिसून येईल.