मुंबई : कमी पगार असतो तेव्हा अनेकांची सततची रडगाणी सुरु असतात. निवृत्तीनंतर काय होणार, पैसे कसे जमणार असाच प्रश्न त्यांना पडत असतो. पण, आता ही चिंता फार काळ टिकणार नाही. कारण, गुंतवणुकीचा एक Best मार्ग सर्वांनाच मदत करणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुमचा गुंतवणूक करण्याचा विचार नसेल किंवा नेमकी कशात गुंतवणूक करावी असा प्रश्न पडला असेल तर ईपीएफ तुमच्यासाठी नक्कीच उत्तम पर्याय ठरु शकतो. EPFO मुळे तुम्हाला अशीच एक संधी उपलब्ध होते. इथे तुमच्या पगारातील काही रकमेचा भाग ईपीएफमध्ये गुंतवल्यास तुम्हाला निवृत्तीनंतर भरपूर पैसा मिळू शकतो.


तुम्हाला माहितीये, ईपीएफमध्ये गुंतवणूकीवर 8.5 टक्क्यांचा व्याजदर दिला जातो. आपण यामध्ये 7 टक्क्यांची पगारवाढ गृहीत धरुया...


तुमची बेसिक सॅलरी 20 हजार रुपये आहे असं गृहित धरुन आम्ही पुढील मांडणी करत आहोत. 


जर तुमची बेसिक सॅलरी अर्थात मूळ वेतन 20 हजार रुपये असेल आणि तुम्ही 25 वर्षांपर्यंत गुंतवणूक केली तर निवृत्तीनंतर तुम्हाला जवळ-जवळ तब्बल 2.79 कोटींची रक्कम परतावा स्वरुपात मिळू शकते.


हे कसं शक्य होऊ शकेल ?



तुमचा 12 टक्के कर्मचारी ईपीएफ सलग 25 वर्षांपर्यंत कपात झाला, तर तुमची प्रति महिना 48 हजारांची गुंतवणूक झालेली असेल. परिणामी निवृत्त झाल्यानंतर तुम्हाला तब्बल 2 कोटी 79 लाखांचा निधी मिळू शकतो.


यासाठी काय काळजी घ्यायला हवी?



खुपंच गरज असल्याशिवाय ईपीएफमधून पैसे काढू नका कारण तुम्ही हे पैसे काढल्याने निवृत्तीनंतरची बचत कमी होईल. उदाहरणार्थ, जर तुम्ही 30 व्या वर्षी पीएफ खात्यातून 1 लाख रुपये काढले, तर वयाच्या 60 व्या वर्षी निवृत्ती निधीतून 11.55 लाख रुपये कमी झालेले असतील.


नोकरी बदलल्यानंतरच तुमचं जुनं अकाउंट ट्रान्सफर करुन घ्या. पीएफ अकाउंट जितकं जुनं असेल तितका अधिक फायदा तुम्हाला मिळू शकेल. तुमचं अकाउंट ट्रान्सफर न झाल्यामुळे नव्या अकांउंटवर व्याज आकारलं जाईल पण जुन्या अकाउंटवरील व्याज 3 वर्षांनंतर बंद होईल. आपण यूएएनद्वारे ईपीएफ अकाउंट सहजपणे ट्रान्सफर करू शकता.