नवी दिल्ली : नवा मोटर वाहन कायदा २०१९ (Motor Vehicle Act 2019) नुसार कायदे आणि दंड अधिक कठोर करण्यात आले आहेत. १ ऑक्टोबर पासून हा कायदा लागू होणार असून त्याची चर्चा देशभरात सुरु आहे. पण तुमच्या गाडीचा परवाना आणि वाहन परवाना आणि रजिस्ट्रेशन सर्टीफिकेट (RC) देखील बदलणार आहे. १ ऑक्टोबर पासून ड्रायविंग लायसन्स आणि आरसी फॉर्मेटमध्ये बदल होणार आहे. या नव्या बदलानुसार वाहन चालकांचे ड्रायविंग लायसन्स आणि आरसी फॉर्मेट एकच असणार आहे. ड्रायविंग लायसन्स आणि आरसीचा रंग, डिझाइन, लुक आणि सुरक्षेचे फिचर्स एकसारखेच असणार आहेत.


मायक्रोचीप आणि क्यूआर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


नव्या नियमानुसार स्मार्ट ड्रायविंग लायसन्स आणि आरसीमध्ये मायक्रोचिप आणि क्यूआर कोड असणार आहे. राज्यामध्ये ड्रायविंग लायसन्स, आरसीचा रंग आणि प्रिंटींग एकसारखी असणार आहे. ड्रायविंग लायसन्स आणि आरसीची माहिती एकाच ठिकाणी मिळू शकणार आहे. आतापर्यंत प्रत्येक राज्याप्रमाणे हा फॉर्मेट बदलत होता. पण आता असे होणार नाही. क्यूआर कोड आणि चिपमध्ये सर्व रेकॉर्ड राहणार आहे.


अडचण काय ? 


ड्रायविंग लायसन्स आणि आरसी संदर्भात प्रत्येक राज्य वेगळा फॉर्मेट तयार करत आहेत. पण काही राज्यांत याच्या सुरुवातीला माहीती छापली आहे तर काहींनी मागच्या बाजूस छापली आहे. पण सरकारच्या नव्या निर्णयानंतर ही माहीती एकसारखी आणि एका जागीच राहणार आहे.