नवी दिल्ली : कर्करोग हा असा आजार आहे ज्यावर कायमस्वरूपी इलाज नाही. या जीवघेण्या आजारामुळे शरीरातील पेशी नष्ट होऊन नंतर हळूहळू अवयव काम करणे बंद करतात. हा आजार वेळीच लक्षात आल्यास कर्करोगावर उपचार करता येतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण, अनेक लोकांना हा आजार झाला आहे याची माहिती काळेपर्यटनट खूपच उशीर झालेला असतो. त्यामुळे त्या योग्य उपचारही होत नाहीत. पण, नुकतीच भारतात एक अशी सुविधा सुरू करण्यात आली आहे ज्यात कर्करोगासह सुमारे 50 त्वचा रोगांचा अवघ्या 15 ते 30 सेकंदात शोध घेतला जाईल.


दिल्लीच्या एम्समधील त्वचाविज्ञान विभागाचे प्रोफेसर डॉ. सोमेश गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार सामान्य डॉक्टरांना त्वचेची स्थिती समजून घेण्यासाठी हे मोबाईल अॅप अतिशय चांगले साधन ठरेल. त्वचारोग तज्ञांच्या तुलनेत सामान्य डॉक्टरांची अचूकता ही 40 ते 50 टक्के असते. त्यामुळे या अॅपद्वारे डॉक्टरांनी रुग्णाच्या शरीरातील जखमेचा फोटो काढून क्लाउड सर्व्हरवर अपलोड केल्यास 15 ते 30 सेकंदात मोबाइल अॅप विश्लेषण करून त्याची माहिती देईल.


भारतातील बर्‍याच लोकांना बुरशीजन्य संसर्ग होत आहे. ज्यामध्ये एक्जिमा, जळजळ अशा अनेक परिस्थितींचा समावेश आहे. हे अॅप स्टिरॉइड्सशिवाय बुरशीजन्य संसर्गाचा सामना करण्यास मदत करेल.


कुठे सुरू झाली ही सुविधा?


ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS), दिल्ली यांनी नुरिथम लॅब स्टार्ट अपच्या संयुक्त विद्यमाने हे स्मार्टफोन अॅप लाँच केले आहे. या अॅपद्वारे त्वचा आणि तोंडाच्या कर्करोगासह त्वचेशी संबंधित इतर समस्या अवघ्या 15 ते 30 सेकंदात शोधल्या जाऊ शकतात.


ऍप 50 हून अधिक आजार ओळखेल


Dermaaid हे अॅप 50 हून अधिक त्वचा रोग ओळखू शकतो. या वर्षाअखेरीस त्वचारोगांची संख्या आणखी अपडेट केली जाईल. हे अॅप त्वचेच्या कर्करोगाच्या प्रकारांबद्दल सुमारे 80 टक्के अचूक माहिती देऊ शकते.


पुरळ, सोरायसिस, त्वचारोग, टिनिया, एक्जिमा, एलोपेशिया अरेटा, बेसल सेल कार्सिनोमा, स्क्वॅमस सेल कार्सिनोमा आणि मेलानोमा आदी ५० रोग या ऍपद्वारे ओळखता येणार आहे. त्वचेचा रोग हा जगातील चौथा सर्वात सामान्य रोग आहे. DermaAid ची आरोग्य सेवा डेटा भारतातील वाढती उपलब्धता आणि स्मार्ट अॅनालिटिक्सच्या जलद विकासासह आरोग्य सेवा प्रणाली आणखी वाढविणार आहेत.


जगात इतके आहेत अॅलोपॅथी डॉक्टर


डॉ. सोमेश यांनी माहिती देताना सांगितले की, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंदाजानुसार भारतात केवळ 12.5 लाख अॅलोपॅथी डॉक्टर आहेत. त्यापैकी केवळ 3.71 लाख विशेषज्ञ किंवा पदव्युत्तर आहेत. अशा परिस्थितीत भारतात त्वचारोग तज्ज्ञांची म्हणजेच त्वचारोगतज्ज्ञांची संख्या खूपच कमी असेल. या अॅपमुळे ग्रामीण भागात जिथे डॉक्टर नाहीत तिथे त्वचेची समस्या समजून घेण्यास मदत होईल.