YouTube Ad Blocker | 2 मिनिटात ब्लॉक होतील सर्व जाहिराती; विना थांबा चालवा युट्युब व्हिडिओ
गूगलच्या ऑनलाईन व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म युट्यूबवर अनेकदा तुम्हाला जाहिरातींचा भडीमार दिसून येतो. तुम्ही अनेकदा युट्युब व्हिडिओ पाहताना मध्येच येणाऱ्या जाहिराती तुमचा मूड खराब करू शकतात.
मुंबई : गूगलच्या ऑनलाईन व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म युट्यूबवर अनेकदा तुम्हाला जाहिरातींचा भडीमार दिसून येतो. तुम्ही अनेकदा युट्युब व्हिडिओ पाहताना मध्येच येणाऱ्या जाहिराती तुमचा मूड खराब करू शकतात. परंतु आता त्रास करून घेण्याची गरज नाही. आम्ही सांगतो ती ट्रिक वापरा आणि युट्युबवरील जाहिरातींना कायमचा रामराम ठोका...
कोणत्याही एक्स्ट्रा चार्जची गरज नाही
काही दिवसांपूर्वी जेव्हा युट्युबने सब्सक्रिप्शन सुरू केले होते. तेव्हा सर्व जाहिराती ब्लॉक होत असत. त्यासाठी गूगल तुमच्याकडून एक विशिष्ट रक्कम आकारत असे. म्हणजेच पैसे दिल्यानंतर युट्यूब जाहिराती तेवढ्या विशिष्ट वेळेसाठी ब्लॉक होत असत. नंतर पुन्हा सुरू होतात.
आम्ही तुम्हाला कोणतीही रक्कम न देता युट्युब जाहिराती बंद करण्याची ट्रिक सांगणार आहोत.
या स्टेप्स फॉलो करा
1 गुगल क्रोम सुरू करा. त्यानंतर adblocker extension chrome सर्च करा
2 AdBlock — best ad blocker - Google Chrome वर क्लिक करा
3 Add to Chrome वर क्लिक करा
4 यानंतर सिस्टिमध्ये एक फाईल डाऊनलोड होईल ती ऑटोमॅटीक इन्स्टॉल होईल.
5 इंन्स्टॉल झाल्यानंतर गूगल क्रोम बंद करा. आणि पुन्हा सुरू करा. URL बारवर Extensionचा Icon दिसून येईल. यावर क्लिक करा आणि AdBlock — best ad blocker हे दिसत असेल तर यापुढे तुम्हाला युट्यूबवर जाहिराती दिसणार नाही.