Shoking Video Goes Viral : आपल्या सर्वांनाच आईस्क्रिम हे आवडतेच मग ते कपमधले असो वा कॅन्डीमधले. गोड पदार्थांनी आपले पोट भरत नाही परंतु त्याने आपले मनं मात्र नक्कीच तृप्त होते.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकांना खाण्याच्या पदार्थामध्ये विविध प्रयोग करायला आवडतात त्यात आईस्क्रिम म्हटले तर त्यावर अनेक जणा नाना तऱ्हेचे प्रयोग करत असतात. 


सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे ज्यात एक युट्यूबरने चक्क लसणापासून बनवलेल्या आईस्क्रिम कॅन्डीचा व्हिडीओ अपलोड केला आहे. आजकाल हे व्हिडीओही तूफान व्हायरल होतात. अनेक पदार्थांना घेऊन विचित्र प्रयोग केले जातात. समोर आलेला हा व्हिडीओ काहीसा असाच आहे. जो पाहून तुम्हीही चक्रावून जाल. 


व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्येएका व्यक्तीने लसणाच्या कळ्यांनी भरलेल्या छोट्या कपमध्ये पाणी ओतले आणि नंतर ते गोठवण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवले. थोड्या वेळाने ते फ्रीजमधून बाहेर काढून त्याची तयार केलेली कॅन्डी तोंडात घेऊन ती व्यक्ती चिघळते. हा एक रिमिक्स मेकर व्हिडीओ आहे तो पाहून अनेकांनी त्याला ट्रोल केले आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर the_fit_jodi नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे. हा व्हिडीओ एका इन्टाग्रामरने शेअर केलाय आणि या व्हिडीओला दोन लाखांहून जास्त लोकांनी पाहिले आहे. या व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, आईस्त घेऊन असे 'पाप' केले आहे की नरकात जागा मिळणार नाही.'