YS Sharmila Assaults Police Video : सोशल मीडियावर एका महिलेला पोलीस कर्मचारी अटक करतानाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये महिला पोलिसांना धक्काबुक्की आणि मारहाण करताना दिसतं आहे. या महिला दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची बहीण आणि वायएसआर तेलंगणा पार्टीच्या नेत्या वाय. एस. शर्मिला आहे.  शर्मिला यांनी पोलिसांनी नुसती धक्काबुक्की नाही तर एका महिला पोलीस कर्मचारीच्या कानशिलातही लागवली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शर्मिला यांना विशेष तपास पथक एसआयटी कार्यालयात जाताना अटक केली. एसआयटी भरती परीक्षेच्या पेपर लीक प्रकरणी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यावेळी ही घटना घटली. एएनआय या वृत्तसंस्थेनेही हा व्हिडीओ त्यांचा अधिकृत ट्विटरवर पोस्ट केला आहे.  (YS Sharmila slaps cop who stopped her from going on Hyderabad protest arrested viral video on social media)



या व्हिडीओमध्ये शर्मिला यांची कार एसआयटीच्या कार्यालयाबाहेर उभी असताना तिथे पोलीस येतात. यावेळी शर्मिला अतिशय रागवलेल्या दिसतं आहे. त्या गर्दीतून एका पोलीस अधिकाऱ्याकडे जातात. त्यांना धक्काबुक्की करता हे करताना दोन महिला पोलीस कर्मचारी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करतात. शर्मिला इतक्या रागात असतात की त्यांनी महिला पोलीस कर्मचारीच्या कानाखाली मारतात. 



मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधिकारी आणि शर्मिला यांच्यामध्ये कुठल्यातपरी विषयावरुन वाद झालेला असतो. धक्कादायक गोष्ट म्हणजे दुसरीकडे शर्मिला यांची आई वाय. एस विजयम्मा देखील पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यांशी वाद घालताना दिसल्या. एवढंच नाही तर त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की केली. दरम्यान शर्मिला यांना पोलिसांनी सध्या हैदराबादमधील जुलबी हिल्स या पोलीस ठाण्यात ठेवलं आहे. 



भरती परीक्षेतील कथित पेपर फुटी प्रकरणामुळे सध्या तेलंगणामध्ये ठिकठिकाणी तीव्र निदर्शने सुरु आहेत. ही परीक्षा तेलंगणा राज्य लोकसेवा आयोगाने आयोजीत केली होती. आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी  11 जणांना अटक केली आहे.