मुंबई : Zee Entertainment Enterprises Limited (ZEEL) भारतातील अग्रगण्य मीडिया आणि एंटरटेनमेंट पॉवरहाऊस, त्याची सर्जनशीलता आणखी मजबूत करण्याच्या प्रयत्नात आता आणखी एक पाऊल पुढे आलं आहे. सर्व उद्योग आणि श्रेणींमधील ग्राहकांसाठी ही नवी संधी आणत  ZEE ब्रँड वर्क्स सादर करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवत ZEE ब्रँड वर्क्स मध्ये ब्रँडिंगसाठी आणखी विस्ताराची संधी देत आहे. ब्रँडिंगची समग्र आणि विस्तृत श्रेणी, विक्री वाढ, ग्राहक संपादन यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. 


या नव्या उपक्रमाची सुरुवात करत आशिष सेहेगल (Chief Growth Officer, ZEE Entertainment Enterprises Ltd) म्हणाले, 'भारतीय माध्यमांमध्ये एक मोठं नाव असल्या कारणानं आम्ही कायम भारतीय प्रेक्षकांचं प्राधान्य अचूकपणे जाणलं आहे. यामुळे आम्हालाही विकसित होण्यास मदत झाली आहे हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. 


ZEE Brand Works लॉन्च करण्यासोबत सेहेगल यांनी आणखी एक हमी दिली. विविध ब्रँड्स त्यांची ध्येयही गाठू शकतील असं त्यांनी स्पष्ट केलं. यासाठी आमचे टेलिव्हिजन, डिजिटल आणि सोशल मीडिया ब्रँड्समधील नाती आणखी घट्ट करण्यास मदत करतील हेसुद्धा त्यांनी स्पष्ट केलं. 


Chief Operations Officer – Revenue, ZEE Entertainment Enterprises Ltd राजीव बक्शी यांनीही या नव्या उपक्रमाची माहिती देत ग्राहकांची आकलनक्षमता लक्षात घेत त्या अनुशंगानं विविध ब्रँडच्या उद्दिष्टांना आपण प्राधान्यक्रम देऊ असं सांगितलं. 


तेव्हा आता ZEE Brand Works चा फायदा विविध ब्रँड्स त्यांच्या पद्धतीनं कसा करुन घेतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण, इथे नव्या युगातील उद्योजकांना, त्यांच्या यशाला आणि त्यांच्या कल्पनांनाही वाव दिला जाणार आहे.