#DeshKaZee : Invesco प्रकरणी ZEEL चे फाउंडर डॉ. सुभाष चंद्रा यांची विशेष मुलाखत
ZEEL-Invesco Matter प्रकरणावर आता ZEEL चे फाउंडर डॉ. सुभाष चंद्रा यांची विशेष मुलाखत
नवी दिल्ली: ZEEL-Invesco Matter: ZEEL झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड आणि सोनी पिक्चर्स यांनी एकत्र येण्याची घोषणा केल्यानंतर इनवेस्कोने खोडा घालण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. इनवेस्कोवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. इनवेस्को नेमकं कुणाच्या हातातील कटपुतली बनून हे सर्व करत आहे असा प्रश्न आता पडला आहे. या प्रकरणावर आता ZEEL चे फाउंडर डॉ. सुभाष चंद्रा यांची विशेष मुलाखत होत आहे.
अनेक प्रश्नांपासून पळ कढतोय इनवेस्को
ZEEL आणि सोनी यांच्यातील झालेल्या करारला सर्व भागधारकांसमोर ठेवल्यानंतर इनवेस्कोनं खोडा घालण्याचा प्रयत्न केला. इनवेस्कोने हे जरी केलं असलं तरी अनेक प्रश्नांची उत्तर देण्यापासून तो पळ काढत आहे. इनवेस्कोच्या मागे नक्की कोण आहे? यामागे कोणाचा हात आहे? चीनकडून इनवेस्कोला मदत मिळते का? असे अनेक प्रश्न पडत आहेत. या सगळ्या प्रश्नांपासून इनवेस्को दूर पळत आहे.
झी न्यूजचे चीफ एडिटर सुधीर चौधरी यांच्यासोबत ZEEL फाउंडर सुभाष चंद्रा यांची या प्रकरणी विशेष मुलाखत आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी इनवेस्कोला आवाहन केलं आहे. याशिवाय अनेक प्रश्न देखील इनवेस्कोसमोर ठेवले आहेत. ही मुलाखत झी मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर प्रसारित करण्यात आली आहे.
ZEE ने या प्रकरणी मोहीमही सुरू केली आहे. चीनचे षड्यंत्र पाहून झीने #DeshKaZee मोहीम सुरू केली आहे. या हॅशटॅगमध्ये सामील होऊन तुम्ही देशातील पहिल्या आणि भारतीय वाहिनीला देखील समर्थन देऊ शकता. तुम्हाला सांगू, बॉलिवूडच्या दिग्गज निर्माता-दिग्दर्शकांनीही ZEE च्या समर्थनार्थ ट्विट केले आहे. यामध्ये सुभाष घई, सतीश कौशिक, बोनी कपूर, मधुर भांडारकर यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे.