मुंबई: ZEEL-Invesco प्रकरणी सध्या वेगवेगळ्या घडामोडी सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर सध्या मोठी अपडेट हाती येत आहे. इन्व्हेस्को प्रकरणात, ZEE ला नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) मध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नॅशनल कंपनी लॉ अपिलेट ट्रिब्युनल (NCLAT) च्या निर्देशानंतर, झी एंटरटेनमेंटला आता 22 ऑक्टोबरपर्यंत उत्तर देण्यासाठी मुदत दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 NCLAT ने गुरुवारी ZEEL च्या अर्जावर सुनावणी करताना म्हटले की, NCLT ने ZEEL ला उत्तर दाखल करण्यासाठी पुरेसा वेळ दिला नाही. असे करणे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाच्या विरोधात आहे. त्यामुळे झी एंटरटेनमेंटला उत्तर दाखल करण्यासाठी वेळ द्यावा.


काय म्हटलंय NCLAT ने सुनावणी करताना? 


ZEEL ने बुधवारीच NCLAT मध्ये इन्व्हेस्कोच्या नोटीस विरोधात याचिका दाखल केली होती. ग्लोबल चायना फंड एलएलसी आणि इन्व्हेस्कोची नोटीस बेकायदेशीर असल्याचे सांगत झीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. 


इन्व्हेस्को चुकीच्या मार्गाने कंपनी ताब्यात घेण्यासाठी EGM घेण्यासाठी आणि बोर्डवर दबाव आणण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. यावर, NCLAT ने ZEEL च्या बाजूने सुनावणी करतNCLT ला निर्देश दिले होते की झी एंटरटेनमेंटला त्यांची बाजू मांडण्य़ासाठी आणि उत्तरासाठी पुरेसा वेळ द्यावा.


झी एंटरटेनमेंट एंटरप्रायजेस लिमिटेड (ZEEL) चे संस्थापक डॉ.सुभाष चंद्रा यांनी ZEEL आणि Invesco अपयशाच्या समस्येबद्दल झी न्यूजचे मुख्य संपादक सुधीर चौधरी यांच्याशी चर्चा केली. 06 ऑक्टोबरला डॉ.सुभाष चंद्रा यांनी माध्यमांच्या अहवालांवर आपले मौन तोडले, ज्यांनी ZEEL-Sony विलीनीकरणावर आक्षेप घेतला होता आणि इनवेस्कोला बोर्डमध्ये हव्या असलेल्या सहा सदस्यांविषयी सत्य समोर आणण्याचे आव्हान दिले होते.


ZEE ने या प्रकरणी मोहीमही सुरू केली आहे. चीनचे षड्यंत्र पाहून झीने #DeshKaZee  मोहीम सुरू केली आहे. या हॅशटॅगमध्ये सामील होऊन तुम्ही देशातील पहिल्या आणि भारतीय वाहिनीला देखील समर्थन देऊ शकता. तुम्हाला सांगू, बॉलिवूडच्या दिग्गज निर्माता-दिग्दर्शकांनीही ZEE च्या समर्थनार्थ ट्विट केले आहे. यामध्ये सुभाष घई, सतीश कौशिक, बोनी कपूर, मधुर भांडारकर यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे.