शेअर मार्केट ब्रोकर Zerodha कंपनीबाबत मोठी अपडेट; यासंबधी सेबीने दिली मंजूरी
शेअर मार्केटमध्ये डिस्काऊंट ब्रोकर म्हणून ओळख असलेली कंपनी झेरोधा आता शेअर होल्डिंगशिवाय म्युचुअल फंडमध्येही बिझनेस सुरू करणार आहे
मुंबई : शेअर मार्केटमध्ये डिस्काऊंट ब्रोकर म्हणून ओळख असलेली कंपनी झेरोधा आता शेअर होल्डिंगशिवाय म्युचुअल फंडमध्येही बिझनेस सुरू करणार आहे. कंपनीचे फाऊंडर नितिन कामथने आपल्या ट्विटर हॅंडलवरून माहिती दिली आहे की, SEBI ने म्युचुअल फंड बिझनेस सुरू करण्याला मंजूरी दिली आहे. कंपनीने जानेवारी 2021 मध्ये एसेट मॅनेजमेंट कंपनीसाठी (Asset Management Company) अर्ज केला होता.
देशातील सर्वात मोठी डिस्काऊंट ब्रोकर कंपनी
सध्या शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यासाठी किंवा ट्रेड करण्यासाठी अनेक डिजिटल ब्रोकर हाऊस सुरू झाले आहेत. Zerodha भारतातील सर्वात मोठा डिस्काऊंट ब्रोकर आहे. आता कंपनीला सेबीकडून म्युचुअल फंड सुरू करण्याचीही परवानगी मिळाली आहे. सध्या कंपनी मार्केटमध्ये गुतवणूकदार आणि ट्रेडर्सला डिस्काऊंट शुल्कात गुंतवणूक / ट्रेड करण्याची संधी देत आहे.
2010 मध्ये सुरू झाले होते Zerodha
कंपनीने शेअर मार्केटमध्ये ब्रोकरेज बिझनेसची सुरूवात 2010 साली केली होती. प्रति ऑर्डरसाठी 20 रुपये ब्रोकरेज फी घेत असत.
MF गुंतवणूकीला आणखी सोपं बनवण्याचे लक्ष
कंपनीच्या या योजनेबाबत कंपनीचे फाऊंडर कामथ यांनी म्हटले की, आमचे लक्ष म्युचुअल फंडला आणि सोपी गुंतवणूक करणे आहे. त्यांचे म्हणणे आहे की, हे जेवढे सोपे होईल. तेवढेच रिटेल आणि नवीन गुंतवणूकदार याकडे आकर्षित होतील.
zerodha gets sebi approval for low cost mutual fund scheme company founder nithin kamath inform on twitter