मुंबई : मुंबईकरांना जेवण घरी ऑर्डर करण्यासाठी Uber Eats हा उत्तम पर्याय होता. पण आता Uber Eats तुमच्या घरी जेवण घेऊन येणार नाही. कार कंपनी उबेर द्वारा ही फूड डिलीवरी सर्विस चालवण्यात येत असे. आता या कंपनीला भारताच्याच एका कंपनीने खरेदी केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Uber Eats या कंपनीला Zomato ने खरेदी केलं आहे. त्यामुळे Uber Eats मार्फत आता जेवण ऑर्डर करणं बंद केलं आहे. 


झोमॅटोने खरेदी केली कंपनी 


Zomato प्रमुख दीपेन्द्र गोयलने सांगितलं की, Uber Eats खरेदी केलं आहे. झोमॅटो पूर्ण देशात 500 शहरांमध्ये डिलीवरी करतात. झोमॅटोने उबेर ईट्स जवळपास 2,500 करोड रुपयांना खरेदी केली आहे. झोमॅटोला गुंतवणुकीकरता Ant Finance ने जवळपास 150 मिलियन डॉलर देण्यात आले आहेत. 


आता तुमचे सर्व उबेर ईट्सच्या ऑर्डर जाणार झोमॅटोला 


मिळालेल्या माहितीनुसार आता कोणत्याही ग्राहकाने उबेर ईट्सवर जेवण ऑर्डर केल्यावर ते सरळ झोमॅटोकडे पोहोचणार आहे. त्यामुळे आता कंपनी उबेर ईट्सने दिलेले सर्व ऑफर्स सुरू ठेवणार आहे का? 


मिळालेल्या माहितीनुसार Uber Eats हे 2017 च्या मध्यावर ही फूड डिलीवरी कंपनी सुरू केली. कंपनीचं असं म्हणणं होतं की, फ्री टाईममध्ये कंपनीच्या कार आणि बाइक जेवण देखील डिलीवरी करतील. कंपनीने याकरता ग्राहकांना नवनवीन ऑफर्स देखील दिल्या. शहरांमध्ये उबेर ईट्सला सर्वाधिक पसंती मिळाली. मात्र या कंपनीला कधीच नफा झाला नाही. त्यामुळे कंपनीचं हे स्वप्न पूर्णच होऊ शकलं नाही.