मुंबई : बंगलुरूमध्ये (Bangluru Zomato Issue ) एका महिलेवर झोमॅटो डिलिव्हरी बॉयने (Zomato Delivery Boy)  हल्ला केल्याचं प्रकरण भरपूर गाजत आहे. या प्ररकरणात पोलिसांनी झोमॅटो बॉयला ताब्यात घेतलं आहे. झोमॅटो डिलिव्हरी बॉय कामराज (Kamraj) आणि पीडित तरूणी हितेशा चंद्रांनी (Hitesha Chandrani) यांचा वाद खूप चर्चेत आहे. या प्रकरणावरून ट्विटरवर गदारोळ सुरू आहे. या दरम्यान झोमॅटोचे सह संस्थापक दीपिंदर गोयल (Deepinder Goyal) यांनी ट्विट करून पहिली प्रतिक्रिया केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिंदर गोयल (Deepinder Goyal) यांनी म्हटलं आहे की,'आपण डिलिव्हरी बॉय कामराजच्यासोबत टचमध्ये आहोत. त्याला फक्त पोलीस चौकशीपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. झोमॅटो कायमच त्याला मदत करत राहिल, असं देखील त्यांनी म्हटलं आहे. (Zomato बॉयचा अटकेनंतर धक्कादायक खुलासा; नेमकं 'त्या' दिवशी काय घडलं?) 


दीपिंदर गोयल यांनी काय म्हटलंय ट्विटमध्ये 


झोमॅटो वादाच्या प्रकरणावर सह संस्थापक दीपिंदर गोयल यांनी ट्विटरवरून स्टेटमेंट जाहीर केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की,'आम्ही या प्रकरणातील सत्य जाणून घेऊ इच्छितो. आम्ही हितेशा आणि कामराज या दोघांच्याही संपर्कात आहेत. या प्रकरणाच्या मुळापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत.'



त्याचप्रमाणे त्यांनी म्हटलं आहे की, 'हितेशाचा संपूर्ण मेडिकल खर्च आम्ही करू. तसेच इतर मदतही आम्ही पुरवत आहोत. तसेच कामराजला देखील आवश्यक ती मदत केली जाणार आहे. नियमानुसार, आता कामराजला निलंबित करण्यात आलं आहे.'(Zomato : महिलेला मारहाणीच्या आरोपावरून झोमॅटो डिलिव्हरी बॉय अटकेत) 


तसेच त्यांनी म्हटलं आहे की,'आम्ही कामराजचा सर्व कायदेशीर खर्च करत आहोत. कामराजने आपल्या 26 महिन्यांच्या करिअरमध्ये 5000 डिलिव्हरी केल्या आहेत. तसेच त्यांची रेटिंग 5 पैकी 4.75 इतकी आहे. एवढंच नव्हे त्याचं काम देखील चांगलं आहे.'