फूड डिलीवरी करण्यासाठी पोहोचला...रिकामा हात पाहून तरुणीनं काय केलं पाहा
हा क्षण खूप भावुक करणारा ठरला एकीकडे डिलीवरी बॉससोबत गैरवर्तनाचे प्रकार घडतात मात्र या तरुणीनं जे केलं ते पाहून तुम्हीही भावुक व्हाल
नवी दिल्ली: रक्षाबंधन हा भावा बहिणीच्या नात्यातील एक गोड सण. मात्र कोरोना किंवा काही कारणांमुळे हा सण आपल्या भावासोबत ज्या बहिणींना साजरा करता येत नाही. कधीकधी रक्ताच्या नात्यापेक्षाही काही मानलेली नातीही तितकीच खास असतात. सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल होत आहे. झोमॅटो डिलीवरी बॉस सोबत याआधी गैरवर्तन किंवा चुकीची वागणूक दिल्याचे व्हिडीओ किंवा फोटो समोर आले होते. मात्र आता एक भावुक करणारा फोटो व्हायरल होत आहे.
रक्षाबंधना दिवशी तरुणीच्या घरी फूड डिलीवरीसाठी आलेल्या झोमॅटो बॉयचा हात मात्र रिकामाच होता. एकीकडे देशात रक्षाबंधनाचा उत्साह होता. मात्र झोमॅटोचा डिलीवरी बॉय त्यावेळी ऑनड्युटी होता. त्याचा रिकामा हात पाहून तरुणीनं त्याच्या हातावर राखी बांधून त्याच्यासोबत रक्षाबंधन साजरं केलं. त्याचा फोटो सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला आहे.
@NiharikaDash14 नावाच्या एका युझरने ओडिया भाषेत कॅप्शन लिहून हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. माझ्या भावाने आज झोमॅटोवरून जेवण मागवलं होतं. जेव्हा झोमॅटो डिलीवरी बॉय जेवण घेऊन आला तेव्हा रक्षाबंधनाच्या दिवशी त्याचा हात रिकामा होता. त्याची परवानगी न घेताच मी एक राखी आणली. त्याला हात पुढे करायला सांगितला आणि राखी बांधून रक्षा बंधनाच्या शुभेच्छा दिल्या. दोघंही खूप भावुक झालो होतो.
एका भावाने माझ्यासाठी खास जेवण ऑनलाइन ऑर्डर केलं होतं. तर दुसऱ्या भावाने हेच जेवणं माझ्यापर्यंत सुरक्षितपणे पोहोचवलं होतं. त्या बदल्यात मला हा दुसरा भाऊही मिळाला. मी खूप खुश आहे असंही ही तरुणी या कॅप्शनमध्ये म्हणाली आहे. सोशल मीडियावर या तरुणीनं केलेल्य़ा कामाबाद्दल तिचं खूप कौतुक होत आहे. याआधी 1600 हून अधिक लोकांनी हे ट्वीट पाहिलं आहे. तर 46 हून अधिक लोकांनी रिट्वीट केलं आहे. अनेक युझर्सनी चांगल्या कमेंट्स केल्या आहेत.