Zomato Delivery Boy Struggle Story: केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीची परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी उमेदवार रात्रंदिवस कठोर अभ्यास करतात. यात यशस्वी झालेल्या आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या यशाच्या कहाण्या आपण वाचल्या असतील. त्यांनी परिस्थितीवर केलेली मात, घेतलेली मेहनत, अथक परिश्रम सातत्य या सर्वाचे ते फलित असते. यशाच्या कहाण्या लगेच सर्वांसमोर येतात. पण कोणी यूपीएससी करण्यासाठी आज अथक मेहनत घेत असेल तर? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. लोकांना वेळेत अन्न पोहोचवणं हे झोमॅटो डिलिव्हरी बॉयच कामं. हे करता करता वेळ मिळेल तसा आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी यूपीएससीची तयारी करणे या झोमॅटो डिलीव्हरी बॉयने सुरु ठेवलं होतं. म्हणून याच विशेष कौतूक होतंय.   


ट्रॅफिकमध्ये UPSC ची तयारी करणाऱ्या Zomato डिलिव्हरी ड्रायव्हरचा फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याच्या मेहनतीचे आणि मेहनतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. Zomato डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल झाला आहे. 


व्हायरल होणारा व्हिडीओ अवघ्या 11 सेकंदाचा आहे. पण यूपीएससीची तयारी करणाऱ्या लाखो तरुणांना प्रेरणा मिळतेय. घरच्या जबाबदाऱ्या, आर्थिक-सामाजिक परिस्थिती अशी अनेक कारणे देत अनेकजण यूपीएससीची तयारी अर्धवट सोडतात. पण यावर मात करुन जे परिश्रम सुरु ठेवतात त्यांना यश मिळत. व्हिडीओत दिसणारा झोमॅटो डिलीव्हरी बॉय ट्रॅफिकमध्ये अडकला असला तरी गाडी बंद असल्याचा फायदा घेत तो अभ्यास करताना दिसतोय.


व्हिडिओ पाहून लोकांना मिळतेय प्रेरणा 



हा व्हायरल व्हिडिओ सर्वप्रथम आयुष संघी या यूजरने सोशल मीडियावर शेअर केला होता. त्याने व्हिडिओसोबत लिहिले की, 'हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, मला वाटत नाही की तुम्हाला कठोर अभ्यास करण्यासाठी तुम्हाला कोणत्या मोटिवेशनची गरज आहे.'आयुष संघीची ही पोस्ट अनेकांना आवडली.यातून खूप जणांनी बोध घेतला. पोस्ट लाईक, फॉर्वर्ड केली. असे करुन आत्तापर्यंत ही पोस्ट तब्बल 44,000 हून अधिक वेळा पाहिली गेली. 


यावर हजार लोक विविध प्रकारे कमेंट करत आहेत. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर अनेकजण आपल्या भावना व्यक्त करत आहेत. खूप प्रेरणादायी! असे काहीजण लिहित आहेत. तर यशाचा मार्ग नक्कीच अवघड आहे, पण त्याचे फळ खूप गोड असेल, असे म्हणत झोमॅटो डिलीव्हरी बॉयला प्रोत्साहन देत आहेत.