Zomato Offers : लोकप्रिय ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो (Zomato) हे नेहमीच चर्चेत असते. अशातच आता कंपनीचे सीईओ दीपंदर गोयल (Deepinder Goyal) यांनी ऑनलाइन फूड डिलिव्हरी (Online Food App) प्लॅटफॉर्म झोमॅटोवर दिसणार्‍या सवलतीच्या ऑफरबद्दल एक मोठे विधान केले आहे. झोमॅटो प्लॅटफॉर्मवर ज्या प्रकारे सवलती दिल्या जातात त्या ग्राहकांची दिशाभूल करत आहेत आणि हे बदलायचे आहे, असा खुलासा सीईओ दीपंदर गोयल यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून झोमॅटोबाबत सातत्याने तक्रारी येत असतात. अशात गोयल यांनी हे विधान केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झोमॅटोचे सीईओ दीपंदर गोयल यांनी मान्य केले की ज्याबद्दल ग्राहकांनी फार पूर्वीपासून तक्रार केली आहे, कंपनीच्या त्या अॅपवरील सवलतीच्या ऑफर अगदी प्रामाणिक नाहीत. यूट्यूबर रणवीर अल्लाबदियाच्या पॉडकास्ट 'द रणवीर शो' मधील मुलाखतीमध्ये दीपंदर गोयल यांना झोमॅटो ग्राहकांना मोठ्या सवलती कशा देते याबद्दल विचारण्यात आले होते. यावर गोयल यांनी मोठा खुलासा केला आहे. "सवलती फार मोठ्या नाहीत, त्या फक्त दिसत असतात. आमच्या प्लॅटफॉर्मवर 80 रुपयांपर्यंत 50 टक्के सवलत अशी ऑफर चालते. ही 50 टक्के सूट नाही, फक्त 80 रुपयांची सूट आहे. ऑर्डर 400 रुपये असल्यास, ती फक्त 20 टक्के सूट असते. सवलत देण्याची ही पद्धत ग्राहकांची दिशाभूल करते," असे गोयल यांनी कबुल केले.


"झोमॅटो आपली रणनीती बदलू शकत नाही कारण आमचे प्रतिस्पर्धीही अशा वाढीव सूट देतात. मी या ऑफरला प्रामाणिक म्हणत नाही. तुम्ही तुमच्या ग्राहकाला काही सांगत असाल तर ते प्रामाणिक असलं पाहिजे. यामध्ये 80 रुपयांची सूट असावी. 50 टक्के सूट 80 रुपयांपर्यंत नसावी. स्पर्धा अशीच सुरू राहिल्यास आपण काहीही बदलू शकणार नाही," अशीही कबुलीही गोयल यांनी दिली.


निवड प्रक्रियेबाबत बोलताना दीपंदर गोयल यांनीही भाष्य केले आहे. "जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना कामावर घेतले जात नाही दीपंदर यांच्या म्हणण्यानुसार, झोमॅटोची भरती प्रक्रिया खूप लांब आहे आणि 8-12 महिने लागतात. आधी, फक्त तीन महिन्यांसाठी मुलाखत घेतली जाते आणि नंतर उमेदवार तीन महिन्यांच्या कालावधीनंतर तो जुन्या कंपनीत राहतो. त्यानंतर तो सोडून झोमॅटोमध्ये सामील होतो. अशा प्रकारे,  कंपनीत सामील होण्यासाठी सहा महिन्यांचा वेळ लागतो आणि त्यानंतर तीन महिन्यांत इंडक्शन होते. त्याची कामगिरी वर्षभरानंतरच कळते. अशातच तुमची दोन वर्षे निघून जातात," असे गोयल म्हणाले.