नवी दिल्ली: झोमॅटो आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या सेवा देत असते. यासोबत झोमॅटो आपल्या ट्विटर आणि इन्स्टावर सतत अॅक्टिव्ह असतं. सध्या सुरू असलेल्या घडामोडींवर झोमॅटो वेगवेगळ्या पद्धतीनं भाष्य करत असतं. झोमॅटोनं एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमुळे आता सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. झोमॅटोला हा फोटो शेअर करून नेमकं काय म्हणायचं असावं असा प्रश्न पडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच आयफोन 13 लाँच करण्यात आला आहे. आयफोन 12 आणि 13 ची तुलना करत झोमॅटोने बर्गरचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. झोमॅटोनं आयफोनची खिल्ली उडवली का असा प्रश्नही आता पडत आहे. झोमॅटोनं शेअर केलेल्या फोटोमध्ये बर्गर एकाच जागी मात्र सॉसची जागा बदलते. 


झोमॅटोनं या फोटोवर आयफोन 12 आणि आयफोन 13 मध्ये इतकाच फरक असल्याचं म्हटलं आहे. साधारण 6 हजारहून अधिक लोकांनी ही पोस्ट लाईक केली आहे. याशिवाय अनेक युझर्सनी यावर कमेंट्सही केल्य़ा आहेत. 







एका युझरने तर झोमॅटोलाच प्रश्न विचारला आहे, तुम्ही विकताय की ट्रोल करताय अशी कमेंट त्याने या फोटोवर केली आहे. तर दुसरीकडे अनेक युझर्सनी यावर हसण्याचे इमोजी आणि तऱ्हेतऱ्हेच्या कमेंट्स केल्या आहेत. यामुळे झोमॅटोनं केलेल्य़ा या पोस्टची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. काही जणांनी झोमॅटोनं बर्गरशी आयफोनची तुलना करणं योग्य नसल्याचं म्हटलं आहे. तर काही युझर्सनी झोमॅटोनं आपलं फूड विकण्यासाठी ही चांगली स्ट्रॅटजी वापरल्याचंही म्हटलं आहे.