मुंबई : पोटात दुखायला लागलं म्हणून डॉक्टरकडे गेला. डॉक्टरने त्याच्या पोटाचा एक्स रे केला. ते पाहून डॉक्टर चकीत झाले तर रुग्णाच्या पायाखालची जमीन सरकली. या व्यक्तीच्या पोटात चक्क 1 किंवा दोन नाही तर 63 नाणी सापडली आहे. राजस्थानमधील जोधपूरमध्ये एका 36 वर्षीय व्यक्तीने एक रुपयाची 63 नाणी खाल्ल्याची विचित्र घटना घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

27 जुलै रोजी पोटात दुखू लागल्याने व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आलं. तपासणीत डॉक्टरांना त्याच्या पोटात धातूचे पदार्थ दिसले. जेव्हा नीट पाहिलं तेव्हा समजसलं की त्या व्यक्तीने 1 रुपयांची 63 नाणी गिळल्याचं समोर आलं.


या व्यक्तीवर दोन दिवस शस्त्रक्रिया सुरू होती. एमडीएम रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने एंडोस्कोपिक प्रक्रियेनं रुग्णाच्या पोटातून नाणी बाहेर काढली. एचओडी (गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी) नरेंद्र भार्गव यांनी सांगितलं की, पोटदुखीची तक्रार घेऊन एक जण आला. 


या रुग्णाचा एक्स-रे केला. तेव्हा या रुग्णाच्या पोटात एक आणि दोन रुपयांची 63 नाणी दिसली जी त्याने गिळली होती. त्याने असं का केलं याबाबत अजून कारण समोर आलं नाही. मात्र या रुग्णाच्या पोटात दुखत असल्याने तो डॉक्टरकडे आला तेव्हा याचा खुलासा झाला. 



डॉ नरेंद्र भार्गव म्हणाले, 'त्या व्यक्तीला पोटात तीव्र वेदना होत असल्याची तक्रार होती. त्याने 10-15 नाणी खाल्ल्याचे सांगितले. हा मानसिक आजार असावा असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे त्यांना या रुग्णाला मानसिक उपचार घेण्याचाही सल्ला दिला आहे.