शुभमन गिलने मोडली लाखो मनं, 15 वर्षांची प्रतिक्षा कायम...Virat kohli चा चेहरा उतरला!
RCB vs GT, IPL 2023: आरसीबीचा पराभव झाल्यानंतर मैदानावर एकच शांतता पसरली होती. तर विराट कोहलीचा चेहरा देखील उतरल्याचं दिसून आलं.
IPL 2023 Playoffs: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स (RCB vs MI) यांच्यातील सामन्यात 198 धावांच्या लक्ष्याच्या पाठलाग करताना गुजरातने 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. शुभमन गिलच्या (Shubman Gill) शतकीय खेळीच्या जोरावर गुजरातने आरसीबीचा पत्ता कट केलाय. किंग कोहलीच्या (Virat kohli) शतकाला शुभमन गिलने शतकाने उत्तर दिलं आणि सिक्स खेचत मुंबई इंडियन्सला चेन्नईच्या फ्लाईटचं तिकिट मिळवून दिलंय.
गेल्या 15 वर्षाची परंपरा आरसीबीकडून कायम राखण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी देखील आरसीबीला आयपीएलचा कप जिंकता येणार नाही. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुमध्ये जल्लोषाचं माहोल आहे. आरसीबीचा पराभव झाल्यानंतर मैदानावर एकच शांतता पसरली होती. तर विराट कोहलीचा चेहरा देखील उतरल्याचं दिसून आलं.
आयपीएल 2023 च्या 16 व्या हंगामातील अंतिम सामन्यासाठी आता चार टीम फिक्स झाल्या आहेत. गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्ज, लखनऊ सुपर जायन्ट्स आणि मुंबई इंडियन्स या संघांनी प्लेऑफमध्ये स्थान मिळवलंय. त्यामुळे आता आयपीएलचा थरार आणखीन वाढल्याचं दिसून येतंय. आता आयपीएलचे मोजून 4 सामने बाकी आहेत. क्वालिफायर 1, एलिमिनेटर, क्वालियाफर 2 आणि फायनल असे चार सामने खेळवले जाणार आहे.
चिदंबरम स्टेडियम येथे गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात क्वालिफायरचा पहिला सामना खेळवला जाणार आहे. 23 मे रोजी संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना खेळवला जाणार आहे. एलिमिनेटर सामना हा मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायन्ट्स यांच्यात खेळवला जाणार आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉकवर होणार आहे.