अवघ्या 30 सेकंदात मृत्यू; पाच वर्षाच्या चिमुरड्याची कुटुंबासह शेवटची पिकनीक
रायगडमध्ये 5 वर्षाच्या लहानग्याचा स्विमिंग पूल मध्ये पडून बुडून मृत्यू झाला आहे. श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.
Raigad Swimming Pool : कुटुंबासह फिरायला गेलेल्या पाच वर्षाच्या चिमुरड्याला अवघ्या 30 सेकंदात मृत्यूने गाठले आहे. श्रीवर्धनच्या दिवेआगर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. पाच वर्षाच्या चिमुरड्याचा स्विमिंग पूल मध्ये पडून मृत्यू झाला आहे. हा मुलगा स्विमिंग पूलमध्ये बुडतानाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 30 सेकंदाचा व्हिडिओ समोर आला आहे.
नेमका काय प्रकार घडला?
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे फिरायला आलेल्या पाच वर्षाच्या लहान मुलाचा स्विमिंग पूल मध्ये पडून बुडून मृत्यू झाला आहे. आविष्कार येळवंडे असे मृत मुलाचे नाव आहे. तो पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यातील सावरदारी गावचा आहे. आविष्कार हा आपल्या कुटुंबासह दिवेआगर इथं फिरायला आला होता.
कुटुंबियांचा डोळा चुकवून हॉटेलच्या समोर असलेल्या स्विमिंग पुलवर पोहोचला. CCTV फुटेजमध्ये अविष्कार स्विमिंग पुलच्या पाण्यात पाय टाकून खेळताना दिसत आहे. अचानक तो पाण्यात उतरतो . परंतु पोहता येत नसल्याने तो गटांगळ्या खावू लागला. 30 सेकंदाचा हा व्हिडिओ आहे. अविष्कार स्विमिंग पुलमध्ये बुडाल्याचे कुणाच्याच लक्षात न आले नाही. त्याचा बुडून मृत्यू झाला आहे.
अविष्कार जवळपास कुठेही दिसत नसल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला. अखेरीस स्विमिंग पूल मध्ये पाहिले असता अविष्कार येथे दिसून आला. त्याला बाहेर काढून तात्काळ हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले मात्र, डॉक्टरांनी त्यांनी मृत घोषीत केले. पोलिस तपासादरम्यान अविष्कार स्विमिंग पूल मध्ये बुडात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आले.
जुळ्या मुलांच्या वाढदिवसा दिवशी घडली भयानक घटना
अखिल पवार हे आपल्या दोन वर्षांच्या जुळ्या मुलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोणावळ्यातील तुंगार्ली इथल्या एका हॉटेलमध्ये आले होते. पावर कुटुंबिय वाढदिवसाची तयारी करत असताना जुळ्या मुलांपैकी एका मुलगा खेळता-खेळता बाहेर आला आणि स्विमिंगपुलमध्ये पडला. मुलगा कुठे दिसत नसल्याने कुटुंबियांनी शोधाशोध सुरु केली. शोध घेत असताना मुलगा पाण्यात बुडल्याचं लक्षात आलं, त्याला पटकण बाहेर काढण्यात आलं पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.
पालकांनी मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्या
पालकांनी मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देण्याची गरज आहे. पालकांचा थोडाही दुर्लक्षितपणा मुलांच्या जीवावर बेतू शकतो. विशेषत: स्विमींग पूल सारख्या ठिकाणी मुलांना एकटे सोडणे धोकादायक ठरू शकते.