मुंबई : केळी (Banana) खाण्याचे अनेक फायदे आहेत. केळीमध्ये कॅल्शियम, कार्बोहाइड्रेट आणि प्रोटीन यांसारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे केळी खाल्ल्याने अनेक समस्या दुर होतात. परंतु कधी कधी केळी खाण्याचे माणसाच्या शरीरावर दुष्परीणामही होतात. त्यामुळे नेमकी कोणत्या वेळी केळी खाल्ली (Banana Side Effects) पाहिजे? आणि कोणत्या वेळी खाऊ नये? हे जाणून घेऊयात.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केळी खाल्ल्याने (Banana Side Effects) अनेक फायदे मिळत असले तरी ते चुकीच्या पद्धतीने खाल्ल्याने तुमचे आरोग्यही बिघडू शकते.जर तुम्हाला केळी खाण्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा असेल, तर तुम्ही या पद्धतीत केळी खाण्यास विसरू नका.


सर्दी झाल्यास केळीपासून दूर राहा


सर्दीचा त्रास असेल तर केळी अजिबात खाऊ नये. या प्रकरणात तुम्हाला इतर अनेक समस्या असू शकतात.आयुर्वेदातही अनेक ठिकाणी सर्दीची समस्या असल्यास केळी खाऊ नये असे सांगितले आहे.


रात्री केळी खाऊ नका


केळी (Banana Side Effects) रात्री खाल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. रात्री केळी खाल्ल्याने तुमचे वजन वाढू शकते आणि झोपेशी संबंधित समस्या देखील होऊ शकतात. केळीमध्ये भरपूर कॅलरीज असतात, त्यामुळे ते पचायला जास्त वेळ लागतो.


अॅसिडिटीची समस्या जाणवते


अॅसिडिटीची समस्या असल्यास केळी (Banana Side Effects) खाऊ नये. केळीमध्ये भरपूर स्टार्च आणि फायबर असतात. त्यामुळे ते पचायला थोडा वेळ लागतो. अॅसिडिटीच्या रुग्णांनी केळी खाल्ल्यास त्यांना गॅस वाढणे, पोटात दुखणे अशा समस्या होऊ शकतात.


रिकाम्या पोटी खाऊ नका


रिकाम्या पोटी केळी (Banana Side Effects) खाल्ल्याने तुमच्या शरीरातील रक्तातील कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण खराब होते. भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असल्यामुळे रिकाम्या पोटी केळी न खाण्याचा सल्ला दिला जातो. तथापि, प्रत्येक व्यक्तीवर त्याचे वेगवेगळे परिणाम होऊ शकतात.


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)