रत्नागिरी : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसाच्या कोकण दौऱ्यावर येत आहेत. रायगड, रत्नागिरी आणि त्यानंतर ते सिंधुदुर्गला जाणार आहेत. सकाळी रायगड दौऱ्यानंतर ते रत्नागिरील्या गणपतीपुळे इथे दाखल होणार आहेत. गणपतीपुळेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुरुवातीला श्रींचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर विकास आराखड्यातील प्रमुख कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गणपतीपुळे पर्यटन विकासासाठी मंजुर झालेल्या सुमारे 102 कोटींचा विकासकामांमधील प्रमुख कामांचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. तसेच गणपतीपुळे येथील आठवडाबाजार मैदानात मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे. 


या दौऱ्यासाठी शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान या दौऱ्यादरम्यन उद्धव ठाकरे नाणारवर काय बोलणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. 



शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये शनिवारी कोकण आवृत्तीमध्ये पहिल्या पानावर रिफायनरीची माहिती देणारी जाहिरात आल्याने शिवसेनेची भूमिका बदलली की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 


याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  खुलासा करावा अशी मागणी होत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या दौऱ्यात याबाबत काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.