प्रणव पोळेकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी एका रुग्णाचा कोरोना तपासणी आहवाल पॉझिटीव्ह आला आहे. मुंबईवरून आलेल्या एका १७ वर्षीय युवतीस कोरोनाची लागन झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मुंबईहून ५ कुटुंबिय जिल्ह्यात आले आहेत. जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर तिच्यासह तिच्या कुटुंबियांची कुडाळ येथे ग्रामिण रुग्णालयात त्यांची तपासणी करण्यात आली होती व त्यांना तात्काळ संस्थात्मक अलगीकरणाक ठेवण्यात आले होते. असे असले तरी सिंधुदुर्गात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसून आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई येथील कॉन्टेनमन्ंट झोनमधून आल्यामुळे त्यांचा स्पॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्यामध्ये तिच्या कुटुंबियातील इतर व्यक्तींचा नमुना अहवाल निगेटीव्ह आला तर या युवतीचा अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. सदर युवतीस कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळलेली नाहीत. आता जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या पुन्हा एक अशी झाली आहे.



नवीन पॉजिटीव्ह अहवाल आलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्याचे काम सुरू असून त्या क्षेत्रामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कार्यवाही आरोग्य यंत्रणेकडून सुरू करण्यात आली आहे. सध्या या रुग्णाची प्रकृती चांगली असून तिला जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.


सिंधुदुर्गात आढळलेला रुग्ण कुडाळ तालुक्यातीलच असताना कुडाळमध्ये सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडतोय. आज आठवडा बाजारात खरेदीसाठी नागरिकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली.  पोलीस बंदोबस्त असतानाही लोकांची खरेदीसाठी झुंबड झाली. संचारबंदी असतानाही कुठलेही नियम न पाळता लोकांनी गर्दी केली. हे घडत असताना पोलिसांची बघ्याची भुमिका पाहायला मिळाली.