मुंबई : व्हॉट्सअ‍ॅप हे असं अ‍ॅप आहे जे जवळ-जवळ सर्वच लोक त्याचा वापर करतात. यावरुन आपण फोटो, व्हिडीओ, मेसेज, Voice मेसेज इत्यादी पाठवू शकतो. एवढेच काय तर व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी नेहमीच काही ना काही वेगळे फीचर्स आणण्याचं प्रयत्न करतो. याच कारणामुळे आजही बहुतेक ग्राहक व्हॉट्सअ‍ॅपशी जोडले गेले आहेत. आता देखील तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप एक मोठी सुविधा देणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पेमेंट करण्याची सोय मिळणार आहे, काही काळपूर्वीपासून व्हॉट्सअ‍ॅपवर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. परंतु, नवीन प्रकरण म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI ने UPI द्वारे डिजिटल पेमेंटसाठी व्हॉट्सअ‍ॅपला 100 दशलक्ष वापरकर्ता संख्या वाढवण्याची परवानगी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हॉट्सअ‍ॅपला मिळालेल्या या मंजुरीचे दोन परिणाम झाले आहेत. एक, सामान्य वापरकर्त्यांना खूप फायदा होईल, कारण व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या करोडोंच्या घरात आहे. याचा दुसरा परिणाम म्हणजे डिजिटल पेमेंटच्या बाजारपेठेतील युद्ध अधिक तीव्र होईल.


सध्या या मार्केटमध्ये फोन पे, गुगल पे आणि पेटीएम सारख्या अ‍ॅप्सचा बोलबाला आहे. आता यूजर बेस वाढवल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप या कंपन्यांना कडवे आव्हान देणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपला देखील त्याच्या या फीचरवरती भरोसा आहे, कारण ग्राहकांना सगळ्याच सुविधा एकाच अ‍ॅपवरती मिळाल्या तर त्यांना वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती जाण्याची गरज भासणार नाही. 


व्हॉट्सअ‍ॅप लवकरच एक नवीन टूल सादर करणार


Whatsapp प्लॅटफॉर्मवर एक नवीन फीचर येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले आहे की, ते एका नवीन टूलवर काम करत आहे, जे ड्रॉइंग टूल आहे. परंतु हे ड्रॉईंग टूल सुरुवातीच्या टप्प्यात फक्त iOS साठी दिला जाईल. तसेच, ब्लर टूल्सच्या मदतीने, बॅकग्राउंडवरील अत्यावश्यक वस्तू लपविल्या जाऊ शकतात.