नालासोपारा: सकल मराठा क्रांती मोर्चाने बुधवारी पुकारलेल्या मुंबई, पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील बंद आंदोलनातून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले होते. मात्र, मोर्चेकरी आक्रमक झाल्याने अनेक ठिकाणी रस्ते अडवून ठेवण्याचे प्रकार घडले. यामुळे अन्य ठिकाणांप्रमाणे पालघरमध्ये वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, नालासोपाऱ्यात आंदोलनाच्या गोंधळातही मोर्चेकऱ्यांच्या माणुसकीचा प्रत्यय आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नालासोपाऱ्यात अशाच वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली होती. पण आंदोलकांनी याही परिस्थितीत संयम दाखवत कोंडीतून रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली.


रेल्वे ओव्हर ब्रीज आंदोलकांनी बंद केला होता. ठिय्या देऊन बसलेल्या आंदोलकांमुळं वाहतूक कोंडीही झाली होती. याच कोंडीत एक रुग्णवाहिका अडकली. गंभीर रुग्ण त्यात असल्याची माहिती आंदोलकांना मिळाली. त्यानंतर लगेचच त्यांनी रुग्णवाहिकेसाठी वाट मोकळी करून माणुसकीचं दर्शन घडवले.