रायगड: दापोली कृषी विद्यापीठाच्या मिनी बसला झालेल्या अपघातापूर्वीच्या अनेक गोष्टी आता हळूहळू समोर येत आहेत. या अपघातात बसमधून पिकनिकला जात असलेल्या ३१ जणांपैकी ३० जण मृत्युमुखी पडले आहेत. तर एकजण आश्चर्यकारकरित्या बचावला. 
 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा अपघात होण्यापूर्वी आंबनेळी घाटात हे सर्वजण थांबले होते. घाटामध्ये असलेल्या एका धबधब्याजवळ थांबून या सर्वांना काही फोटोही काढले. याठिकाणी असणाऱ्या कणीस विक्रेत्याने त्यांना अखेरचं पाहिले होते. यानंतर मिनीबस काही अंतरावर गेली आणि थेट दरीत कोसळली.


मातीच्या ढिगाऱ्यावरुन बस घसरली आणि थेट ३०० मीटर खोल दरीत कोसळली. सर्वच्या सर्व ३० जणांचे  मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आले आहे. दरम्यान, राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाखांची मदत जाहीर केली आहे.