ठाण्यातील श्रीकृष्ण मंदिरात दरोडा, ४० लाखांचा ऐवज लंपास
सीसीटीव्ही कॅमेरा बंद करून चोरटयांनी ही चोरी केली.
ठाणे: ऐन गोकुळष्टामीच्या दिवशी ठाण्याच्या श्रीकृष्ण मंदिरात दरोडा पडल्याचा प्रकार समोर आला आहे. खारकाळ अळी परिसरातल्या कृष्ण मंदिरातून चोरट्यांनी ४० लाखांचा ऐवज लंपास केला. यामध्ये देवाचे दागिने आणि रोख रक्कमेचा समावेश आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपासाला सुरुवात केली आहे. सीसीटीव्ही कॅमेरा बंद करून चोरटयांनी ही चोरी केली. मागच्या दरवाजाचे कुलुप तोडून ही चोरी करण्यात आली. यावेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या वायर तोडण्यात आल्या. त्यामुळे पोलिसांसमोर चोरांचा माग कसा काढायचा, हे आव्हान निर्माण झाले आहे.