ठाण्यात भरदिवसा तरुणीवर चाकूने केले सपासप वार, हल्लेखोर फरार
हल्लेखोराने या २२ वर्षीय तरुणीवर चाकूने सपासप वार केले.
ठाणे: गेल्या काही महिन्यांत रिक्षाचालकांकडून महिलांच्या विनयभंग होण्याच्या घटना ताज्या असतानाच शनिवारी ठाणे शहर आणखी एका घटनेने हादरले. येथील आरटीओ ऑफिस रोड परिसरात भरदिवसा एका तरुणीवर हल्ला करण्यात आला. प्राची झाडे असे या मुलीचं नाव असून ती ठाण्याच्या जोशी-बेडकर महाविद्यालयात वाणिज्य विभागतील दुसऱ्या वर्षात शिकते. हल्लेखोराने या २२ वर्षीय तरुणीवर चाकूने सपासप वार केले. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन फरार झाला. यानंतर लोकांनी तरुणीला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तिच्या प्रकृतीबद्दल अजून कोणतीही ठोस माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या घटनेने ठाण्यात मोठी खळबळ उडाली आहे.