मुंबई : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan) भाऊ (Salman Khan's Brother) अरबाज खान (Arbaaz Khan) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अरबाज लवकरच ‘तनाव’ (Tanaav) या वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सीरिजमधून अरबाजनं ओटीटीवर पदार्पण केलं आहे.  इस्रायल वेब सीरिज फौदा’ या वेब सीरिजवरून 'तनाव' (Tanaav Web Series) ही प्रेरित आहे. सध्या या वेब सीरिजचं शूटिंग काश्मिरमध्ये सुरु आहे. या वेब सीरिजसाठी अरबाजनं 25 वर्षात पहिल्यांदाच ऑडिशन दिलं. याआधी कधीच ऑडिशन दिलं नाही याचा खुलासा अरबाजनं केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरबाजनं नुकतीच हिंदुस्तान टाइम्सला मुलाखत दिली होती. यावेळी 25 वर्षात ऑडिशन दिल्याचे सांगत अरबाज म्हणाला, 'इस्राइलच्या फौदा या वेब सीरिजला प्रेरित होऊन तनाव या वेब सीरिज प्रेरित आहे. लॉकडाऊनच्या काळात ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस आली होती. या वेब सीरिजबद्दल इतर लोकांकडूनही ऐकलं होतं. त्यानंतर मी ही वेब सीरिज पाहिली. जवळपास एका आठवड्यात मी या सीरिजचे 3 सीझन पाहिले. असं मी कधी केलं नाही पण ही वेब सीरिज मी पाहिली.'


ऑडिशन देण्याविषयी काय म्हणाला अरबाज वाचा -


याविषयी सांगत अरबाज म्हणाला, 'मला वाटलं की भारतात अशाप्रकारच्या वेब सीरिजची गरज आहे. शिवाय त्या सीरिजमध्ये मला भूमिका मिळावी अशी माझी इच्छा होती. कारण या वेब सीरिजमध्ये प्रत्येक वयातील एक भूमिका आहेत. दरम्यान, अप्लॉय फिल्मनं 8 महिन्यांपूर्वी मला ‘तनाव' या वेब सीरिजसाठी कॉल केला होता. त्यानंतर कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्या ऑफिसमधून मला कॉल आला की, एका भूमिकेसाठी तुम्हाला शार्टलिस्ट करण्यात आलं आहे. तुम्ही एक ऑडिशन टेप पाठवा.'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


ऑडिशनबद्दल बोलत अरबाज म्हणाला, 'तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण 1996 साली प्रदर्शित झालेल्या ‘दरार’ या चित्रपटातून मी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण आता पर्यंत मी कोणत्याही चित्रपटासाठी कधीच ऑडिशन दिलं नाही. मला सगळेच चित्रपट दिग्दर्शकांच्या पसंतीमुळे मिळाले. त्या काळी ऑडिशन देण्याची गरजही नसायची. त्यामुळे मी सगळे चित्रपट ऑडिशन न देताच केले. जेव्हा मुकेश छाब्रा यांनी मला ऑडिशन देण्यास सांगितलं तेव्हा मला थोडं विचित्र वाटलं पण हे एक आव्हान असल्यासारखं मी घेतलं.' (Arbaaz Khan Opens Up About His First Audition After 25 Year of long career) 


हेही वाचा : Rapper Drake ने लता मंगेशकरांच्या 'दीदी तेरा देवर दीवाना' गाण्याचं बनवलं रीमिक्स, Video Viral


दरम्यान, अरबाजनं ‘फौदा’ सीरिजमधील मिकी मोरेनोची भूमिका या सीरिजमध्ये साकारली आहे. पण तनावमध्ये अरबाजला पाहून मिकी मोरेनोची कॉपी असल्यासारख वाटायला नको म्हणून अरबाजनं स्वतःच्या लूकमध्ये बरेच बदल केले. या वेब सीरिजमध्ये अरबाज एका बंडखोरी विरोधी युनिटच्या कमांडरची भूमिका साकारत आहे.