मुंबई : रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण ही जोडी हिंदी चित्रपटसृष्टीत खूप प्रसिद्ध आहे. या दोन सुपरस्टार्सची लव्हस्टोरी ते ब्रेकअपपर्यंतची कथा खूप गाजली आहे. सध्या रणबीर आणि दीपिका दोघंही आपापल्या जोडीदार आलिया भट्ट आणि रणवीर सिंगसोबत त्यांच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतीच आलिया आई झाली आहे आणि अभिनेत्री तिचं आईपण खूप एन्जॉय करत आहे. तर, दुसरीकडे रणवीर आणि दीपिका त्यांच्या आयुष्यात खूप खुश आहेत. मात्र रणबीर आणि दीपिकाची लव्हस्टोरी जेवढी गाजली तेवढंच या दोघांचं ब्रेकअप गाजलं होतं. दीपिकाने अनेकदा रणबीरवर आरोपही केले आहेत. अशाच एका अभिनेत्रीच्या वक्तव्याबद्दल सांगणार आहोत  ज्यानंतर एकच खळबळ माजली होती.


करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोमध्ये येणारे सेलेब्स अशी काही विधान करतात ज्यानंतर वाद निर्माण झालाच पाहिजे. रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण काही वर्षांपूर्वी एकमेकांना डेट करत होते. दीपिकाने रणबीरच्या नावाचा टॅटूही काढला. जो तिने ब्रेकअपनंतर काढून टाकला.


त्याचवेळी दीपिका पदुकोण आणि सोनम कपूर कॉफी विथ करणमध्ये पोहोचल्या होत्या. करण जोहरने तिला विचारलं की, जर रणबीर कपूरला ब्रँड प्रमोट करण्यासाठी दिलं तर तुमच्या मते काय व्हायला हवे. याला उत्तर देताना दीपिकाने वेळ न घालवता 'कंडोम' म्हटलं. यानंतर दीपिकाने स्पष्टपणे सांगितलं की, हे सगळं केवळ गंमतीने म्हटसं गेलं आहे, परंतु या विधानामुळे मोठा भूकंप झाला होता.


यासोबतच रणबीरने बॉयफ्रेंड म्हणून आपले कौशल्य सुधारलं पाहिजे, असंही दीपिकाने म्हटलं आहे. एकेकाळी सोनम कपूर देखील रणबीरच्या खूप जवळची मानली जात होती. दोघांनी एकत्र बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.