Rani Mukerji च्या कुटुंबावर शोककळा; जवळच्या व्यक्तीचं निधन
राणी मुखर्जीने जवळच्या व्यक्तीला गमावलं; कुटुंबातील खास व्यक्तीने घेतला अखेरचा श्वास
Rani Mukerji and family : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जीच्या (rani mukerji) कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला आहे. कारण अभिनेत्रीच्या आजीचे निधन झालं आहे. लोकप्रिय देबक्षी रॉय (Debarshee Roy) यांची आई आणि राणी मुखर्जीची आजी आरती रॉय यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. आरती रॉय (arati roy) यांनी वयाच्या 92व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. वयाशी संबंधित आजारांनी त्रस्त असलेल्या आरती रॉय यांचं मंगळवारी 8 नोव्हेंबर 2022 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
वयाच्या 92 व्या वर्षी आईचं निधन (Debarshee Roy mother arati roy) झाल्यानंतर काय म्हणाल्या दोबश्री रॉय. 'मला कळालं देखील आई कधी मला सोडून निघून गेली. मी फक्त आणि फक्त माझ्या आईमुळे अभिनेत्री झाले. वयाशी संबंधित आजारांनी आई त्रस्त होती. इतर कोणताही आजारा त्यांना नव्हता...'
त्यापुढे म्हणाल्या, 'जेव्हा आईचं निधन झालं, तेव्हा त्यांच्या तिन्ही मुली त्यांच्या जवळ होत्या.' असं म्हणत दोबश्री रॉय यांनी भावना व्यक्त केल्या. आरती रॉय यांचं निधन झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. (rani mukerji grand mother marati roy)
देबश्री यांनी अनेक ठिकाणी आईवर असलेलं प्रेम व्यक्त केलं. देबश्री यांनी आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी शोबिझमध्ये प्रवेश केला. एका टीव्ही शोमध्ये 'माझ्यासाठी माझी आई सर्वकाही आहे.' असं म्हणत देबश्री यांनी आईवर असलेलं प्रेम व्यक्त केलं आहे. (mother love)