पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आज जयंती. ज्या काळात मुलींना शाळेत जाण्याची परवानगी नव्हती त्या काळात अहिल्याबाई होळकरांनी शिक्षण घेतलं. या त्यांच्या जयंतीनिमित्ताने मुलींची खास अशी नावे. ज्याचा अर्थ 'ज्ञान' असा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी जन्म झाला. अहिल्याबाई होळकर यांनी महिला सक्षमीकरण आणि समाज कल्याणासाठी काम केले. अहिल्याबाई होळकरांच्या जीवनात शिक्षणाला अधिक महत्त्व होतं. अशावेळी त्यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊया मुलींची अशी खास नावे ज्यामध्ये दडलाय 'ज्ञान' असा अर्थ. 


अहिल्या 


अहिल्या हे नाव अहिल्याबाई होळकर यांच्या नावावरुन आलं आहे. याचा अर्थ आहे ताकद, नेता, धैर्य. अहिल्याबाई होळकर यांचं नाव त्यांच्या नेतृत्व आणि प्रशासकीय गुणांबद्दल ओळखलं जातं. त्यामुळे तुम्हाला या नावाचा विचार करायला काहीच हरकत नाही. 


लक्षिता 


लक्षिता हे नाव राणी लक्ष्मीबाई यांच्या नावावरुन प्रेरित घेऊन आले आहे. या नावात शूरता, राष्ट्रभक्ती आणि लवचिकता असा अर्थ दडला आहे. तसेच राणी लक्ष्मीबाई यांच्यातील गुण आपल्या मुलीत उतरतील. लक्षिता या नावात शौर्य दडलेलं आहे. 


विद्या 


विद्या हे नाव संस्कृतमधील नाव आहे. या नावाचा अर्थ आहे ज्ञान, शिक्षण, शिकणे, अभ्यास असा होतो. या नावाचा विचार तुम्ही तुमच्या मुलीसाठी करु शकता. 'विद्या' या दोन अक्षरी नावांचा विचार करु शकता. 


सरस्वती 


सरस्वती हे हिंदू देवतेचे नाव आहे. देवी सरस्वती ही ज्ञान, संगीत आणि कलेची देवता आहे. सरस्वती या नावाचा अर्थ आहे शहाणपण आणि सर्जनशीलता. 


हे पण वाचा - पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त खास मॅसेज, पोस्ट आणि स्टेटस 


गार्गी 


गार्गी हे नाव शहाणपण आणि हुशार या अर्थाने तुम्ही मुलीसाठी ठेवू शकता. या नावाचा विचार मुलीच्या नावाकरता नक्की करु शकता. 


मेधा 


मेधा या नावाचा अर्थ देखील शहाणपण, हुशार असा आहे. तुम्ही मुलीसाठी या नावाचा विचार नक्कीच करु शकता. 


अवंती 


अवंती हे नाव देखील अवंती बाई यांच्यावरुन प्रेरीत होऊन घेतलं आहे. या नावाचा अर्थ आहे ताकद, धैर्य, हुशार असा याचा अर्थ आहे. 


तारा 


तारा हे नाव राणी ताराबाई भोसले या नावावरुन घेण्यात आलं आहे. चिकाटी, धैर्य आणि शहाणपण या अर्थासाठी हे नाव ओळखलं जातं. तारा हे दोन अक्षरी नाव तुमच्या मुलीसाठी ठरेल खास.