टॉफी घशात अडकल्याने चार वर्षांच्या मुलाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. मुलाला त्रास होत असल्याचे पाहून कुटुंबीयांनी तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचाराअभावी बालकाचा मृत्यू झाला. या घटनेने कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली. टॉफी कंपनीच्या मालकावर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. दुसरीकडे घटनेनंतर दुकानदाराने दुकान बंद करून घटनास्थळावरून पळ काढला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अन्वित हा जरोली फेज-1 येथील राहुल कश्यप यांचा चार वर्षांचा मुलगा होता. वडिलांनी सांगितले की, रविवारी संध्याकाळी त्यांनी परिसरातील एका दुकानातून फ्रूटोला नावाची किंडरजॉयसारखी टॉफी विकत घेतली होती. ही टॉफी अतिशय चिकट आणि कडक होती. ते खाल्ल्यानंतर मुलाच्या घशात अडकले आणि त्यानंतर मुलाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. 


अन्वितला पाणी देताच त्याच्या घशात टॉफी अडकली आणि मुलाची प्रकृती बिघडल्याने कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात नेले. तिथे उपचार न मिळाल्याने त्याचा दुर्दैवी अंत झाला. एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच आई सोनालिका दुःख अनावर झाले. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. तसेच आपल्यापैकी अनेकांनी अशा प्रसंगांचा सामना केला आहे. अशावेळी हा प्रसंग कसा सांभाळाल? 


मुलांच्या घशात का अडकतं चॉकलेट?


तज्ज्ञांच्या मते, जेव्हा एखादी वस्तू एखाद्याचा घसा ब्लॉक करते,तेव्हा त्याला श्वास घ्यायला त्रास होतो आणि जीव गुदमरु लागतो. लहान मुलांमध्ये हा प्रकार चॉकलेट, टॉफी खाताना होतो. डॉक्टर म्हणतात की हार्ड कँडीमुळे सर्वात जास्त गुदमरल्यासारखे होते. त्यानंतर इतर कँडी, जसे की मांस आणि हाडे यांचे कडक किंवा मोठे तुकडे. हार्ड कँडी व्यतिरिक्त, इतर अनेक खातानाही लहान मुलांना घास लागतो. 


खालील पदार्थांमुळे होतो त्रास? 


पॉपकॉर्न
चिप्स
गाजराचे तुकडे
कच्च्या भाज्यांचे तुकडे
चीजचे तुकडे
चिकट मिठाई
पीनट बटर
च्युइंगम


गुदमरल्याची चिन्हे आणि लक्षणे


श्वास किंवा घरघर होणे
जोरात खोकण्याचा प्रयत्न करा
बोलणे, रडणे किंवा कोणत्याही प्रकारचा आवाज करणे अशक्य आहे
मुलांचा चेहरा निळा पडतो
त्यांचा गळा पकडतो किंवा हवेत हात फिरवतो
मुल घाबरलेले दिसणे


ही परिस्थिती कशी सांभाळाल? 


तज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही परिस्थिती अत्यंत शांतपणे हाताळली पाहिजे. तुम्ही सर्वप्रथम बाळाला बॅकस्लॅप केले पाहिजे. मुलाला थोडं खाली वाकवून पाठीवर फटके मारावे. बॅकस्लॅप करण्यासाठी, तुमच्या मुलाच्या पाठीवर कमीतकमी 5-6 वेळा फटके मारा.


जे 12 महिन्यांपेक्षा मोठे असेल तर त्याच्यासाठी वेगळी पद्धत फॉलो करु शकता. मुलाला मांडीवर आढव झोपवून त्याला कंबरेतून खाली वाकवा आणि पाठीवर फटके मारा.  


मुलांमध्ये गुदमरणे कसे टाळता येईल?


जेव्हा तुम्ही मुलांना अन्न देता तेव्हा काही गोष्टी नेहमी विचारात घ्याव्यात. विशेष म्हणजे नेहमी वयानुसार आहार द्या. 
तज्ज्ञांच्या मते, वेगवेगळ्या वयोगटातील मुलांना खाण्याच्या बाबतीत वेगवेगळ्या गरजा असतात. लहान मुलांना दाढ नसल्यामुळे, ते अन्न चावू शकत नाहीत किंवा कुस्करू शकत नाहीत आणि म्हणून त्यांना फळे आणि भाज्या किंवा मिठाई देताना काळजी घेणे आवश्यक आहे.
अन्नाचे लहान तुकडे करा. लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या अन्नाचा आकार पाहणे नेहमीच महत्त्वाचे असते. तुमच्या मुलाचे अन्न नेहमी लहान तुकडे करुन द्या जेणे करुन ते घशात अडकणार नाही. 
मुलांना जेवायला बसवा, बसवून जेवण भरवा. 
तसेच जेवताना मुलं हसणार नाही याची काळजी घ्या.