जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा जन्म हा मुळात आनंदासाठी झालाय. माणसाच्या शरीरातही हॅप्पी हार्मोन्स असतात. लहान मुलांमध्ये देखील हे आनंदी हार्मोन्स असतात. पण या हार्मोन्सची निर्मिती करण्यासाठी पालकांनी विशेष मेहनत करण्याची गरज आहे. कारण मुलांमध्ये लहान वयातच हॅप्पी हार्मोन्स निर्माण झाले तर त्यांची वाढ आणि शारीरिक सकारात्मक बदल होण्यास मदत होते. 


हॅप्पी हार्मोन्स म्हणजे काय? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोपामाइनला आनंदी संप्रेरक किंवा रिवॉर्डिंग हार्मोन देखील म्हणतात. हे मेंदूमध्ये काम करणारे एक प्रकारचे न्यूरोट्रांसमीटर आहे जे मेंदूला शरीराच्या इतर भागांशी जोडलेले ठेवते. हॅप्पी हार्मोन्स चार प्रकारचे असतात. डोपामाइन, सेरोटोनिन, एंडोर्फिन आणि ऑक्सीटोसिन या रुपात ओळखले जाते. 


स्पर्श 


पालकांनी मुलांना मिठी मारणे, प्रेम व्यक्त करणे यासाठी कोणत्या कारणाची गरज नाही. पण मुलांमध्ये हॅप्पी हार्मोन्स निर्माण करण्यासाठी पालकांनी मुलांना मिठी मारणे गरजेचे असते. शारीरिक स्पर्श आणि त्वचेपासून त्वचेचा संपर्क ऑक्सिटोसिनच्या प्रकाशनास उत्तेजन देऊ शकतो. ज्याला 'लव्ह हार्मोन' देखील म्हणतात. 


हेल्दी स्नॅक्स 


हॅप्पी हार्मोन्स निर्माण करण्यासाठी मुलांचा आहार देखील त्यांना मदत करत असतो. अशावेळी पालकांनी मुलांना केळी, शेंगदाणे, बिया आणि दुग्धजन्य पदार्थ आहारात द्यावेत. तसेच सेरोटोनिनची पातळी वाढवणारे पदार्थ, मूड सुधारणारे पदार्थ हॅप्पी हार्मोन्स तयार करतात. 


प्रोत्साहनाचे शब्द 


मुलांमध्ये हॅप्पी हार्मोन्स निर्माण करण्यासाठी आहार, स्पर्श यासोबतच प्रोत्साहनाचे शब्द देखील तितकेच महत्त्वाचे ठरतात. मुलांना त्यांच्या यशाबद्दल आणि प्रयत्नांबद्दल टीका, प्रशंसा कमी करा. त्यापेक्षा प्रोत्साहनाचे शब्द महत्त्वाचे ठरतात. यामुळे शरीरातील डोपामाइनची पातळी वाढते. 


सूर्यप्रकाश 


मुलांमध्ये हॅप्पी हार्मोन्स वाढवण्यासाठी सूर्यप्रकाश देखील तितकाच महत्त्वाचा आहे. मुलांना थोडावेळ सूर्यप्रकाशात घेऊन जा. यामुळे सेरोटोनिनचे प्रमाण शरीरात वाढते. ज्यामुळे मूड चांगला राहते आणि झोपही चांगली होते. 


क्वालिटी टाईम 


मुलांसोबत क्वालिटी टाईम घालवा. ज्यामधे त्यांच्या आवडीच्या गोष्टी करण्यामध्ये पालकांनी वेळ घालवावा. जसे की, वाचन करणे, कोडी सोडवणे, आवडत्या गोष्टीवर गप्पा मारणे. यामुळे हॅप्पी हार्मोन्स तयार होण्यास मदत होते. 


शारीरिक ऍक्टिविटी 


पालकांनी मुलांसोबत शारीरिक ऍक्टिविटी करण्यासही वेळ घालवावा. जसे की, व्यायाम करणे, एकत्र खेळणे, शारीरिक हालचाल यामध्ये अतिशय महत्त्वाची आहे.