पर्स म्हणजे स्त्रियांच्या रोजच्या धावपळीच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. मार्केटमध्ये वेगवेगळ्या फॅब्रिकच्या पर्स मिळताता पण त्यात आपल्याला फायदेशीर पर्स कोणती ते निवडावी हे कळत नाही. फॅशन एक्सपर्ट उर्मिला निंबाळकरच्या मते तुमच्या व्यक्तीमत्त्वाला साजेसं त्याचबरोबर तुमच्या जॉब प्रोफेशननुसार तुमच्याकडे पर्सचं कलेक्शन असायला हवं. तुमच्याकडे असलेल्या बॅग्जचं आणि पर्सचं कलेक्शन तुमचं स्टेटस दाखवतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पर्स निवडताना काय पहावं ? 



शारीरिक रचना
तुमच्या शरीर रचनेप्रमाणे बॅग्ज वापरल्यास तुमच्या व्यक्तिमत्त्वावर त्याचा परिणाम होतो. जर तुम्ही बारीक असाल तर मोठी बॅग घेणं टाळावं. मोठ्या आकाराच्या पर्स तुम्हाला झाकून टाकतात. त्याचबरोबर तुम्ही जर उंच आणि धिप्पाड असाल तर अगदी लहान आकाराच्या पर्स तुमच्या पर्सनॅलिटीला शोभत नाही. 



तुमच्या प्रोफेशननुसार पर्स निवडावी 
तुम्ही जर कॉर्पोरेटमध्ये कामाला आसाल तर तुमचा  घराच्या चाव्या, हेडफोन्स्, मोबाईल, लॅपटॉप, मोबाईल आणि लॅपटॉप चार्जर, फाईल्स, डॉक्युमेंट्स या सगळ्या महत्त्वाच्या वस्तू सोबत घ्याव्या लागतात यासाठी मार्केटमध्ये चाललेल्या ट्रेंडपेक्षा तुम्हाला सोयीस्कर होईल अशा बॅग्ज निवडाव्यात. 



तुम्ही करत असलेला प्रवास 
तुम्ही रोज कोणत्या वाहनाने प्रवास करता त्यानुसार तुम्ही पर्स निवडायला हवी. जसं की मुंबईत बहुतांश स्त्रिया या लोकलने प्रवास करत असतात. लोकलमधल्या गर्दीमध्ये हॅन्डबॅग्ज वापरणं अवघड होतं. त्यामुळे शक्यतो जर तुम्ही रोजच्या रोज ट्रेनने प्रवास करत असाल तर सॅग हा उत्तम पर्याय आहे. 



शॉपिंगप्रमाणे पर्स निवडावी
लाईफस्टाईल, पर्सनॅलिटीप्रमाणे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही फिरायला जाताना कोणत्या वस्तू खरेदी करणार आहात त्यानुसार पर्स विकत घेणं फायदेशीर ठरतं. जर तुम्ही गृहीणी असाल तर भाज्या, घरात लागणारं सामान शॉपिंग करण्यासाठी तुम्ही मोठी आणि जड बॅग न वापरता फोल्डींग पिशवीचा वापर करु शकता. 



ऑरगोनाझर पर्स 
अश्या पर्समध्ये खूप जास्त कप्पे असल्याने छोट्या छोट्या वस्तू ठेवणं सोयीस्कर होतं. यामध्ये सॅनिटायझर, चार्जर,पैश्यांची छोटी बॅग, आणि मेकअपचं छोटसं किट, मेडीसीन,चावी,पेन या वस्तू आरामात राहू शकतात.