Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांच्या अनेक गोष्टी लोकांसाठी मार्गदर्शक ठरत असतात. यावेळी आचार्य चाणक्य यांनी अशा 5 लक्षणांबद्दल सांगितले आहे की, ज्या घरामध्ये अशुभाचे कारण ठरू शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अचानक वाद 


जर तुमच्या कुटुंबामध्ये अचानक वाद आणि भांडणे होत असतील तर ते अशुभ मानले जाते. आचार्य चाणक्य यांच्या मते, जर तुमच्या कुटुंबावर बाहेरच्या कोणाच्या तरी वाईट नजरेचा प्रभाव पडला असेल त्याचा परिणाम आर्थिक संकटाच्या रुपातही तो दिसून येतो. त्यामुळे ही समस्या टाळण्यासाठी कुटुंबातील सदस्यांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहून सकारात्मक वातावरण ठेवलं पाहिजे. 


घरातील वनस्पती कोरडी पडणे


चाणक्य नीतिनुसार, आपल्या घरात ठेवलेले तुळशीचे रोप जर सतत सुकत असेल तर ते अशुभ मानले जाते. त्यामुळे भविष्यात तुम्हाला पैशांच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो. यावर उपाय म्हणजे झाडांची चांगली काळजी घेणे आणि तुळशीच्या झाडाला नियमित पाणी देणे. तसेच तुमच्या घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक ठेवा.


मोठ्या व्यक्तींचा आदर न करणे


चाणक्य म्हणतात की, ज्या घरात ज्येष्ठांचा आदर केला जात नाही, त्या घरात धनाची देवी लक्ष्मी कधीही वास करत नाही. यासोबतच कुटुंब कधीही आनंदी दिसत नाही. त्यामुळे आपल्या वडिलांचा आदर करणे आणि त्यांची सेवा करणे खूप महत्वाचे आहे. जर घरातील वातावरण सकारात्मक असेल तर  घरात देवी लक्ष्मीची कृपा राहते.


काच फुटणे


आचार्य चाणक्य यांच्या मते,  जर तुमच्या घरात काचेच्या गोष्टी वारंवार तुटत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्याचबरोबर तुम्हाला अनेक गोष्टींचा सामना करावा लागेल. यावर उपाय म्हणजे तुटलेली काच ताबडतोब काढून टाकणे. घरातील स्वच्छतेची काळजी घेणे. 


पूजेत अडचणी येणे


आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्या घरात पूजा नियमित होत नाही त्या घरात पैसा कधीच राहत नाही. कुटुंबातील सदस्यांना नेहमी पैशाची चिंता असते. ही समस्या टाळण्यासाठी घरामध्ये नियमित पूजा करा आणि देवाचे ध्यान करा. यामुळे संपत्ती तर वाढेलच, पण मानसिक शांतीही मिळेल.