International Day of Happiness : जगातील सर्वात आनंदी देशांची यादी, पाकिस्तानही भारतापुढे
International Day of Happiness 2024 : संयुक्त राष्ट्रसंघ दरवर्षी 20 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय आनंद दिन साजरा करते. याचदरम्यान संयुक्त राष्ट्राने जगातील सर्वात आनंदी देशाची यादी जाहिर केली आहे. या यादीत पाकिस्तान भारतापेक्षा जास्त आनंदी असल्याचे पाहायला मिळत आहे.
International Day of Happiness 2024 in Marathi: नेहमी हसत राहिलं पाहिजे जेणेकरुन आयुष्य वाढतं, असं म्हटलं जातं. हसरा चेहरा हा जगातील सर्वात सुंदर चेहरा असतो. मग तो दिसायला कसाही असाल तरी. हसण्याने आयुष्यातील सर्व प्रश्न सुटतात आणि आयुष्य मोकळेपणाने जगण्याची नवीन दिशा दिसते. पण आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपण हसणंचं विसरुन गेलो आहे. आयुष्यात हसणे आणि हसवणे किती महत्त्वाचे आहे हे आपण विसरतो. हेच हास्य चेहऱ्यावर सजवण्यासाठी आणि आयुष्य सुंदर करण्यासाठी दरवर्षी 20 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय आनंद दिन साजरा करतो.
हा दिवस देश किंवा अर्थव्यवस्थेचा विकास होण्यासाठी केवळ जीडीपीच नाही तर आनंदाचीही तितकीच गरज असते. 12 जुलै 2012 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने जगभरातील लोकांच्या जीवनात आनंद आणि आरोग्य हे महत्त्वाचे ध्येय बनवण्यासाठी आणि जीवनातील आनंदाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी 20 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय आनंद दिवस म्हणून घोषित करण्यात आला. पण याचपार्श्वभूमीवर Annual world happiness report 2024 ने जगातील सर्वात जास्त आनंदी देशांची यादी जाहीर केली आहे. मात्र या यादीतील भारत कितव्या स्थानावर हे पाहिलं तर धक्काच बसेल...
आनंदी राहायला कुणाला आवडणा नाही, पण प्रत्येक माणून आनंदी राहण्याचा प्रयत्न करत असतो. कुणाला आर्थिक त्रास असतो तर कोणाला टेन्शन असतं तर कुणाला कौटुंबिक तणाव असतो, तर कुणी आजारांनी त्रस्त असतो. आनंदी राहण्यासाठी अनेकदा लोक वेगवेगळे उपाय करतात. मात्र त्यानं ते आनंदी होतीलच असं नाही. मानसिक दृष्टिने आनंदी राहणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. असे असताना संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्समध्ये फिनलंडला सलग सहाव्यांदा आनंदी देश ठरला आहे.
या यादीत कोणता देश किती खुश आहे. तर कोणता देश जास्त दुखी आहे यावर अभ्यास केला जातो. यामध्ये प्रामुख्याने सामाजिक समर्थन, उत्पन्न, आरोग्य, स्वातंत्र्य आणि भ्रष्टाचार यावर जास्त भर दिला जातो. मात्र यानुसार भारतातील लोक आनंदी राहण्यामध्ये खूपच मागे आहेत. या यादीमध्ये भारतापेक्षा किती तर पट्टीने पाकिस्तानमधील लोक जास्त आनंदी असल्याचे निर्दशनात आले आहे.
आनंदी देशात पाकिस्तानही भारतापुढे...
वार्षिक जागतिक आनंद अहवाल 2024 नुसार 146 देशांमधून भारत 126 व्या क्रमाकांवर आहे. तर यामध्ये भारतातील मिजोरम या राज्यातील लोक जास्त आनंदी आहेत. तर पाकिस्तान 108 व्या क्रमाकांवर असून भारतापेक्षा पाकिस्तामधील लोक जास्त आनंदी असल्याचे पाहायला मिळत आहे.