भारतात चवीने पदार्थ खाणारे अनेक खवय्ये आहेत. भारतातील प्रत्येक मैलावर एक वेगळी खाद्यसंस्कृती आहे. महत्त्वाचं म्हणजे भारताने ती आजही जपली आहे. मात्र भारतातील असा एक पदार्थ आहे जो जगभरातील नावडत्या पदार्थांच्या यादीत 60 व्या क्रमांकावर आहे. TasteAtlas ने जाहीर केलेल्या यादीत जगातील 100 न आवडणाऱ्या पदार्थांची यादी आहे. यामध्ये भारतातील एका भाजीचा क्रमांक 60 व्या नंबरवर आहे. ही भाजी आहे वांग-बटाटा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वांग-बटाटा ही भाजी प्रत्येक घरात केली जाते. महत्त्वाचं म्हणजे भारतातील अनेक समारंभात आणि कार्यात वांग-बटाटा भाजीला महत्त्वाचं स्थान असतं. असं असलं तरीही या भाजीला 5 पैकी 2.7 रेटिंग देण्यात आलंय.  ही यादी जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावरुन लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. TasteAtlas ने जाहीर केलेल्या या यादीत बटाटा आणि वांग्यापासून तयार केलेली भाजी 60 व्या स्थानावर आहे. अहवालात या भाजीचे साधे आणि चवदार असे वर्णन केले आहे. उत्तर भारतीय आणि महाराष्ट्रातही ही भाजी चवीने खाल्ली जाते. ही भाजी तयार करण्यासाठी कांदा, टोमॅटो आणि वेगवेगळे मसाले वापरले जातात. 


TasteAtlas च्या यादीने या भाजील 5 पैकी 2.7 रेटिंग दिलं आहे. मात्र सोशल मीडियावर ही यादी पाहून लोकं हैराण झाले आहेत. कारण लोकांना हे कसं शक्य होऊ शकतं. हा प्रश्न आहे. फूड ब्लॉगिंग ग्रुप फूडकर्सच्या प्रभज्योत सिंह यांच म्हणणं आहे की, हे ऐकून एका राजाचं मन तुटलं. वांग हा भाज्यांचा राजा आहे. संपूर्ण उत्तर भारतात सगळ्या ढाबा, रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये ही भाजी चवीने खाल्ली जाते. ही यादी निवडण्यात सहभागी असलेल्या ज्युरी सदस्यांनी भारतात येऊन एकदा खऱ्या वांग-बटाट्याच्या भाजीचा आस्वाद घ्यावा, असेही ते म्हणाले.


TasteAtlas च्या यादीनुसार 10 नावडते पदार्थ 


पदार्थ  देश  रेटिंग 
हकराल आइसलँड 1.8
रेमेनबर्गर  अमेरिका 1.9
येरुशलमी कुगेल इजरायल 2.0
Kalvsylta  स्वीडन 2.2
स्कलंड्रौसिस   लातविया  2.2
चॅपलेले  चिली 2.2
कॅल्सक्रोव  स्वीडन  2.2
Bocadillo De Carne De caballo स्पेन 2.3
मार्माइट आणि चिप सँडविज  न्यूझीलँड 2.3