Children Incomplete Sleeps : गेल्या काही दिवसांपासून शालेय मुलांची अपुरी झोप आणि शाळेची वेळ यावर जोरदार चर्चा होत आहे. राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी,'मुलांची झोप पूर्ण होणे गरजेचे आहे. सध्या शाळांच्या वेळेमुळे ती होत नाही. तर शाळांनी आपल्या वेळा बदलायला हव्यात'हे विधान केलं. तेव्हापासून मुलांच्या झोपेवर जोरदार चर्चा होत आहे. पण फक्त मुलांच्या अपुऱ्या झोपेला शाळेची वेळच नाही तर इतर काही गोष्टीही जबाबदार आहोत. त्या कोणत्या ते जाणून घेऊया आणि त्यावरचा तोडगा तज्ज्ञ काय सांगतात ते ही पाहूया?


मुलांना किती तासाची झोप आवश्यक?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Cleveland Clinic च्या रिपोर्टनुसार, मुलांची झोप नेमकि किती तासाची असावी हा प्रश्न पालकांना पडतो. प्रत्येक वयोमानानुसार, झोपेचे तास बदलत असतात. शालेय जीवनातील मुलांना जवळपास 9 ते 12 तासांची झोप आवश्यक असते. मात्र ते आताच्या धावपळीच्या जीवनात शक्य होत नाही. प्रत्येक वयानुसार किती झोप महत्त्वाची पाहूया.


वय 

झोपेचे तास

बेबी (4 ते 12 महिने)  12 ते 16 तासांची झोप
टॉडलर (12 ते 24 महिने) 11 ते 14 तासांची झोप
प्रीस्कूल (3 ते 5 वर्षे)   10 ते 13 तासांची झोप
किड्स (6 ते 12 वर्षे)  9 ते 12 तासांची झोप 
टिनएजर (13 ते 18 वर्षे)  8 ते 10 तासांची झोप 

स्क्रिन टाईम 


लहान मुलांच्या अपुऱ्या झोपेले स्क्रिन टाईमही जबाबदार आहे. कारण अनेकदा मुलं टिव्ही किंवा मोबाईल पाहत राहतात. या सगळ्यात त्यांच्या नजरेवर तीव्र, गडद रंग पडत असतात आणि स्क्रिनचा प्रकाशही यामुळे झोपेसाठी आवश्यक असलेला मंद प्रकाश किंवा झोपेसाठी असलेले वातावरण निर्माण होत नाही. यामुळे मुलांची झोप लांबते. 


पालकही जबाबदार 


अनेकदा पालक मुलांच्या वेळेनुसार दिनक्रम तयार करत नाही. हल्ली पालक दोघेही वर्किंग असतात. अशावेळी त्यांच्या कामाच्या वेळा आणि मुलांची झोपेची वेळ मॅच होत नाही. अशावेळी मुलं पालकांसाठी जागे राहतात कारण आपण झोपलो तर पालक भेटणार नाहीत, ही भिती त्यांच्या मनात असते, अशावेळी मुलं झोपण्यास नकार देतात. 


दुपारची झोप 


अनेकदा मुलं आजी-आजोबांसोबत राहतात किंवा पाळणाघरात राहतात. अशावेळी मुलांना थोडा आराम मिळावा आणि सांभाळणाऱ्या व्यक्तीलाही थोडा आराम मिळावा या दृष्टीकोनातून मुलांना दुपारचं झोपवलं जातं. यामुळे मुलांची झोप दुपारी बऱ्यापैकी कव्हर होते पण रात्री ते लवकर झोप पूर्ण होत नाही. 5 वर्षांपर्यंतच्या मुलांना दुपारी झोपवणे हे योग्य आहे पण 6 वर्षांपुढील मुलांना दुपारी न झोपवणेच योग्य असते. 


झोपेचा आरोग्यावर काय परिणाम होतो?


पुरेशी, चांगली, कोणताही अडथळा न येता घेतलेली झोप तुमच्या निरोगी आरोग्यासाठी चांगली असते. आयुर्वेदानुसारही, सुर्यादयासोबत उठावं आणि सूर्यास्त झाला की झोपावं. पण हे आताच्या दिनक्रमात शक्य होत नाही. अशावेळी पालकांनी मुलांसाठी विशेष प्रयत्न करावेत. कारण रात्री साधारण 9 ते 1 वाजेपर्यंतचा काळ हा मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. तसेच हार्मोन्सची ग्रोथ देखील या काळातच वाढ होते. उंची वाढण्यास आणि तब्बेत चांगली होण्यास मदत होते. 


डॉक्टरांची प्रतिक्रिया


आजकाल पालकांची ही एक सामान्य तक्रार आहे की त्यांच्या मुलांना लवकर उठणे कठीण जाते. हे आपल्याला मूळ प्रश्नाकडे परत आणते जो आपण स्वतःला विचारला पाहिजे: आपण असे वातावरण तयार करत आहोत की ज्यामुळे बाळाला झोप येईल? यासाठी पालकांना लवकर रात्रीचे जेवण, झोपण्याच्या किमान एक तास आधी इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर थांबवणे, दिवे मंद करणे आणि बाळांना झोपण्यासाठी चांगले वातावरण तयार करण्याचा सल्ला देतो. जर आपण पालक या नात्याने झोपेच्या वेळी त्यांच्यासमोर सतत आमच्या ऑफिस कॉल अटेंड करत राहिलो किंवा आम्हाला स्वतःला आमची आवडती वेबसिरीज बंद करणे कठीण वाटले तर मुलाला झोपणे स्वाभाविकपणे कठीण होईल, असे डॉ. शिल्पा बाविस्कर, बालरोगतज्ज्ञ, अंकुरा रुग्णालय पुणे यांनी सांगितले आहे.