उन्हामुळे होणारे नुकसान कमी होण्यास मदत


उन्हामुळे त्वचेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. सूर्याचे अतिउष्ण किरणं त्वचेवर पडल्यास त्वचा भाजते त्यामुळे खाजदेखील  येते. म्हणूनच उन्हात बाहेर पडण्यापूर्वी भाताचं पाणी थंड करून चेहऱ्याला लावावं. काही वेळाने चेहरा धुवावा आणि मग बाहेर जावं. यामुळे त्वचेचं नुकसान होत नाही. त्वचेवरील लालसरपणा कमी होतो आणि त्वचेला थंडावा मिळतो.



फेशिअल क्लिंजर म्हणून काम करतं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाताच्या पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचेवर चिकटलेली धूळ,माती निघून जाते. भाताचं पाणी आपण टोनर म्हणूनदेखील वापरू शकतो. कापसाच्या मदतीने हे पाणी चेहऱ्याला लावावं आणि काही वेळाने चेहरा धुवावा. 



त्वचेवरील छिद्र लहान होतात


आपल्या त्वचेवर लहान लहान छिद्र म्हणजे पोर्स असतात. या छिद्रांमधून बाहेरील वातावरणातील धूळ,माती त्वचेच्या आत जाते. त्यामुळे त्वचेचं नुकसान होत. भाताचं पाणी लावल्यास या छिद्रांचा आकार लहान होतो.



ब्लॅकहेडस् आणि व्हाईटहेडस् पासून मुक्ती मिळते


भाताच्या पाण्यामुळे त्वचेवरील ब्लॅकहेडस् आणि व्हाईटहेडस् कमी होण्यास मदत होते. या पाण्यामुळे आपली त्वचा अधिक चमकदार होते. त्वचेचा रुक्षपणा दूर होतो.


मुरूमांपासून सुटका मिळते


चेहऱ्यावर भाताचं पाणी लावल्यास चेहऱ्यावरील मुरुम कमी होण्यास मदत होते.  मुरुम येण्यास प्रतिबंध होतो. ऑयली त्वचेसाठी हे पाणी अधिक फायदेशीर ठरतं. यामुळे त्वचेवरील तैलग्रंथी नियंत्रणात राहतात.


हेही वाचा : 24 तास मऊ राहतील मोदक! कोणता तांदूळ वापरावा, अशी तयार करा घरच्या घरी पिठी; या घ्या Tips



 


भाताचं पाणी बनविण्याचा विधी :


आवश्यकतेनुसार तांदूळ घेऊन तो शिजत ठेवावा.


रोजच्या जेवणातील भातापेक्षा शिजवताना त्यात अधिक पाणी घालावे.


भात शिजल्यानंतर पाणी बाजूला काढून ते चेहऱ्यावर लावावे. 
 


(Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याला दुजोरा देत नाही.)